For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Railway | सोलापूर स्थानकावर प्रवाशांचा जीव टांगणीला! इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी रेल्वे रुळांवरच झुंबड

05:28 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
solapur railway   सोलापूर स्थानकावर प्रवाशांचा जीव टांगणीला  इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी रेल्वे रुळांवरच झुंबड
Advertisement

                                    सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची भीषण गर्दी

Advertisement

सोलापूर -उन्हाळी सुट्टी सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सोलापूर रेल्वे स्थानकावर सोमवारी (दि. ०६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गंभीर प्रकार पाहायला मिळाला. सोलापूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या 'इंद्रायणी एक्प्रेस मध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांनी जीव धोक्यात घालत झुंबड घातल्याचे चित्र दिसून आले. या प्रकारामुळे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... दुपारी १.१५ वाजता सोलापूर स्थानकात दाखल होणारी इंद्रायणी एक्प्रेस सुमारे दीड तास उशिराने आली. यामुळे अनेक प्रवासी थांबले होते. गाडी येण्यापूर्वीच अनेक प्रवासी विरुद्ध दिशेने जाऊन जागा पकडण्यासाठी रेल्वे रुळांवर उतरले. काहीजण तर फलाट क्रमांक दोनच्या ट्रॅकवर उभे राहून गाडी येण्याची वाट पाहत होते.

गाडी स्थानकात येताच चढ-उतारासाठी एकच झुंबडउडाली. पुण्याहून आलेल्या प्रवाशांना उतरायलाही वाव मिळत नसताना, आतमध्ये चढण्याचा प्रयत्न सुरू होता. विशेषतः जनरल डब्यांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासही जागा मिळत नव्हती.दरम्यान, रेल्वे सुरक्षा बल (इड) आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी कोणीही उपस्थित नव्हते. गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनाकेवळ कागदावरच आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोहमार्गाचे वरिष्ठ अधिकारी आणि आरपीएफ चे वरिष्ठ अधिकारी याकडे आता लक्ष देणार का किंवा एखाद्याचा बळी गेल्यावर अशा प्रकाराकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असल्याचेहीनिदर्शनास आले.पुणे-सोलापूर मार्गावर रोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. उन्हाळी सुट्टी सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. ही संख्या आणखीन वाढणार आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्थानकावरील कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Advertisement

रेल्वे प्रशासनाचा गाफीलपणा?
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी हंगामात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. तरीदेखील आवश्यक त्या नियोजनाचा अभाव असल्याची टीका होत आहे. प्रवाशांना रगित उभे करून सुरक्षितरीत्या चढ-उतार करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात मात्र गोंधळाचे वातावरण दिसून आले. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करणे, प्लॅटफॉ र्मवरील शिस्तबद्ध व्यवस्था आणि जनरल डब्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.