मुंबई-बेळगाव विमान रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय
12:27 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : मुंबईहून बेळगावला येणारे विमान मंगळवारी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तांत्रिक कारणाने विमान रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण विमान कंपनीने दिले असले तरी यामुळे प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. वारंवार विमानफेऱ्या रद्द होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई-बेळगाव मार्गावर स्टारएअरचे विमान सेवा देते. मंगळवारी हे विमान बेळगावला येणार होते. यासाठी प्रवाशांनी बुकिंगही केले होते. परंतु तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत विमान रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. बेळगावला पोहोचून लग्न समारंभ, मिटींग यासाठी येणाऱ्या प्रवाशांना फटका बसला. असे प्रकार वारंवार घडत असल्याने काही प्रवाशांनी आपला रोषही व्यक्त केला.
Advertisement
Advertisement