For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढली

06:21 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रवासी वाहनांची विक्री 4 टक्क्यांनी वाढली
Advertisement

मे महिन्यातील आकडेवारीचा समावेश : सियामच्या आकडेवारीतून माहिती सादर

Advertisement

नवी दिल्ली  :

मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढून 3,47,492 युनिट्सवर पोहचली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने एका अहवालात ही माहिती दिली आहे. सियामने म्हटले आहे की मे महिन्यात 55,763 तीनचाकी वाहने विकली गेली, तर दुचाकींची विक्री 16,20,084 युनिट्स इतकी झाली. मे महिन्यात तीनचाकी वाहनांची विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीतील 48,610 युनिट्सच्या तुलनेत 14.7 टक्के अधिक होती. दुचाकी विक्री देखील मागील वर्षीच्या याच कालावधीतील 14,71,550 युनिट्सच्या तुलनेत 10.1 टक्के जास्त आहे. ऑटो उद्योगाला 2024-25 मध्ये स्थिर वाढ अपेक्षित आहे.

Advertisement

सियामचे अध्यक्ष विनोद अग्रवाल म्हणाले, ‘प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि तीनचाकी वाहने या सर्व विभागांमध्ये मे 2023 च्या तुलनेत मे 2024 मध्ये वाढ झाली आहे. प्रवासी वाहनांमध्ये केवळ किरकोळ वाढ झाली आहे.

सामान्य मान्सूनपेक्षा चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आणि नवीन सरकारचा आर्थिक विकासावर सतत भर असल्याने 2024-25 मध्ये वाहन उद्योगात स्थिर वाढीची अपेक्षा केली जात आहे. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

सियामचे संचालक राजेश मेनन म्हणाले, मे 2024 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री  आतापर्यंतची सर्वाधिक होती. तथापि, मे 2023 च्या तुलनेत 3.9 टक्केची किरकोळ वाढ झाली आहे. मे 2024 मध्ये एकूण उत्पादन 24,55,637 युनिट होते. मे 2024 मध्ये प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी आणि क्वाड्रिसायकलचे एकूण उत्पादन 24,55,637 युनिट होते.

मे महिन्यात विक्रीत 1 टक्के घसरण : फाडा संघटनेची माहिती

प्रचंड उष्णतेसोबतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीमध्ये वर्षाच्या आधारावर एक टक्क्यांची घसरण मे मध्ये अनुभवायला मिळाली आहे. वाहन क्षेत्राशी संबंधीत संस्था फाडा यांनी या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.

प्रवासी वाहनांची नोंदणी मे मध्ये 3 लाख 3 हजार 358 इतकी राहिली होती. यापूर्वी म्हणजे मे 2023 मध्ये 3 लाख 35 हजार 123 प्रवासी वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, मागच्या महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका त्याचप्रमाणे वाढलेल्या उष्णतेमुळे लोकांनी वाहन खरेदीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे विक्रेत्यांना ग्राहकांचा कार खरेदीसाठी अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. अनेकांकडे गाडी घेण्यासाठी रोखीचा अभाव आहे हे देखील कारण पुढे आले आहे. प्रचंड उष्णतेमुळे विक्रेत्यांच्या शोरूमला येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील मे मध्ये 18 टक्क्यांपर्यंत घसरणीत राहिली होती. या उलट दुचाकी विक्रीमध्ये मात्र मेमध्ये समाधानकारक स्थिती होती. मे महिन्यामध्ये दोन टक्के वाढीसह 15 लाख 34 हजार 856 दुचाकींची विक्री झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये 14 लाख 97 हजार 778 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती.

Advertisement

.