राजधानी एक्सप्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल लंपास! घटनांमध्ये वाढ
खेड / प्रतिनिधी
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लंपास करण्याचे प्रकारही वाढत चालले आहे. राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आंजणी रेल्वेस्थानकानजीक घडली. अज्ञात चोरट्यावर शनिवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
संतोषकुमार के.ओ. (४८, रा. एर्नाकुलम) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ते १२४३२ क्रमांकाच्या निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमधील ए-०१ डब्यातील ११ क्रमांकाच्या आसनावरून निजामुद्दीन येथून तिरुवअनंतपूरम येथे जाण्याकिरता प्रवास करत होते. त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. तर दुसरा मोबाईल बोर्डावरती ठेवला होता. ते झोपी गेल्याचे संधी साधत अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपये किंमतीचे मोबाईल लंपास केले.
१० दिवसापूवाच अज्ञात चारव्याने एका प्रवाशांची दीड लाख रुपय किमतीचा मोबाईल लांबबला होता. यापाठोपाठ महिला प्रवाशांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या दोन घटनाही घडल्या होत्या. तसेच एका प्रवाशाची सोनसाखळी लांबवली होती. रेल्वेगाड्यांमध्ये टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाही अजूनही ही बाब रेल्वे पोलिसांनी गांभिर्याने न घेतल्याने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. दागिन्यांसह मोबाईल लंपास होण्याच्या घटनांमध्ये बाढ झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.