For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळात आज ‘यात्री सुविधा दिवस’

01:10 PM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळात आज ‘यात्री सुविधा दिवस’
Advertisement

12 वर्षांत 26 लाख प्रवाशांचा विमान प्रवास

Advertisement

बेळगाव : विमानतळ प्राधिकरणातर्फे देशव्यापी उपक्रमांना अनुसरून सोमवार दि. 15 रोजी बेळगाव विमानतळात ‘यात्री सुविधा दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात मागील 12 वर्षांत विमान वाहतूक पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुविधांमध्ये झालेल्या विकासाची माहिती दिली जाणार आहे. 2014 ते 2026 या 12 वर्षांच्या कालावधीत अनेक विकासात्मक कामे करण्यात आली. खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्था (एफटीओ), उडान-3 अंतर्गत 13 शहरांना विमानसेवा सुरू करण्यात आली होती. सध्या दिल्ली, बेंगळूर, मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद या पाच शहरांना विमानसेवा दिली जात आहे. मागील 12 वर्षांत 51 हजार 261 विमानफेऱ्या झाल्या असून 26 लाख 57 हजार 664 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तर 131 मेट्रीक टन कार्गो वाहतूक झाल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे. विमानतळावरील धावपट्टी 1800 मीटरवरून 2300 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नवीन टर्मिनल बिल्डींग बांधकाम केले जात असून चार बोर्ल्डींग ब्रिज तयार केले जाणार असल्याचे बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांनी कळविले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.