For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार पार्वती

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार पार्वती
Advertisement

अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव दीर्घकाळापासून ‘कॅप्टन इंडिया’वरून चर्चेत आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. मधल्या काळात हा चित्रपट गुंडाळला गेल्याची चर्चा होती. परंतु आता याच्या निर्मितीने वेग पकडला आहे. चित्रपटासाठी नव्या नायिकेची निवड निर्मात्यांनी केली आहे. मागील काही काळापासून अनेक दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. आता यात अभिनेत्री पार्वती थिरुवोथूचे नाव जोडले गेले आहे. कार्तिक आर्यनसोबत ती कॅप्टन इंडिया चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिमित अमीन करणार आहे. शिमित यांना चक दे इंडिया चित्रपटासाठी ओळखले जाते. कॅप्टन इंडिया चित्रपटात पार्वती महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. परंतु तिच्या पात्राविषयी अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. प्रामुख्याने मल्याळी अन् तमिळ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पार्वतीने 2017 साली ‘करीब करीब सिंगल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. अशास्थितीत आता जवळपास 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ती बॉलिवूडमध्ये परतण्यास तयार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.