महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्वरीची श्रृती प्रभूगावकर गजाआड

12:29 PM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोकरी देण्याच्या आमिषाने 1.25 कोटींचा गंडा

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 1.25 कोटी ऊपयांना गंडविल्याप्रकरणी  ढवळी-फोंडा येथील एका प्रतिष्ठित हायस्कूलच्या शिक्षकाला गजाआड केल्यानंतर काल मंगळवारी सकाळी याप्रकरणातील मास्टरमाईंड महिला ठकसेन श्रृती अक्षय प्रभूगावकर (36, पर्वरी) हिला पर्वरी येथून अटक केली आहे. तिला फोंडा प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता 4 दिवसांच्या रिमांडवर कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या जवळच्या सिनेमागृहात ‘भुलभुलैया 3’ हा चित्रपट कोटी ऊपये कमवित असून फोंड्यातील जनतेला ‘भुलभुलैया’ करून गंडविणाऱ्या 3 महिलांचीही कोटी ऊपयांच्या उड्डाणांचा दरदिवशी पर्दाफाश होत आहे.

Advertisement

नागेशी येथील संगम बांदोडकर यांच्या तक्रारीनुसार शिक्षक योगेश य. शेणवी कुंकळकर (49, रा. ढवळी, भगवती मंदिराजवळ) याला फेंडा पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केल्यानंतर सुमारे 20 जणांना 1.25 कोटी ऊपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जॉब स्कॅममध्ये आपण केवळ मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत असल्याचा पवित्रा योगेशने घेतला आहे. जॉब स्कॅम प्रकरणातून सहीसलामत सुटण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर श्रृती प्रभूगावकर हिचे नाव त्याने उघड केले होते. त्यानंतर तपासाची चक्रे त्यादिशेने फिरवत फोंडा पोलिसांनी मास्टरमाईंड महिला ठकसेन श्रृतीला पर्वरी येथून अटक करण्यात आलेली आहे. फोंडा पोलिसांवरही प्रकरण मिटविण्यासाठी बराच दबाव होता. योगेश शेणवी कुंकळकर याची 3 दिवसांच्या रिमांडवर कोठडीत रवानगी केलेली आहे.

 संशयित योगेश शेणवी कुंकळकर याने ठकसेन श्रृती प्रभूगावकर हिचे नाव घेतल्यानंतर तिच्या घरी शोधाशोध केली होती. तिचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रितसर गुन्हा नोंदवून श्रृतीविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. तिच्या ठिकाणाचा सुगावा लागल्यानंतर मंगळवारी सकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासानंतर तिला अटक करण्यात आली. संशयित श्रृती हिची छायाचित्रे भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्याबरोबर सोशल मिडीयावर व्हायरल झालेली आहेत. तसेच ती नुवे येथील भाजपाच्या युवाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होती. त्यात किती तथ्य आहे? याविषयीही कसून चौकशी होत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

संशयित योगेश शेणवी कुंकळकर या शिक्षकाने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून माजी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे सांगितल्याने त्यांचेही दाबे दणाणले आहेत. या चौकशीत 1.25 कोटी ऊपये घेतल्याचे उघड झाले आहे. संशयित योगेशने उपजिल्हाधिकारी, अबकारी खात्यात अधिकारी व अन्य उच्च पदासाठी नोकरी लावण्याचे सांगत रक्कम घेतली होती. या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच जॉब स्कॅम प्रकरणाला प्रोत्साहन मिळत असल्याचे तिन्ही प्रकरणातून अधोरेखित होत आहे. फोंडा पोलिसांनी अटक केलेला योगेश शेणवी कुंकळकर (शिक्षक) व म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेला संदीप परब (अभियंता) या दोन्ही घटनेत दोघेही सरकारी अधिकारी उच्चशिक्षित मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. बेरोजगारांनी विश्वास ठेवून रोख रक्कम त्यांच्या स्वाधीन केली. योगेश शेणवी कुंकळकर याच्याकडून ही रक्कम श्रृती हिला पोहोचलेली आहे. संदीप याच्याकडून रोख रक्कम दीपश्री सावंत गावस हिला मिळालेली आहे. दोघेही कमिशन एजंट, ठकसेन महिला आता पोलिस कोठडीत पोहोचल्या आहेत. मात्र याप्रकरणातील ‘सुपर वुमन ठकसेन’ मोकाट असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article