For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑटोनगरमध्ये पार्टी पेपर शॉट्स-स्पार्कल कँडल कारखान्याला आग

11:41 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑटोनगरमध्ये पार्टी पेपर शॉट्स स्पार्कल कँडल कारखान्याला आग
Advertisement

बेळगाव : ऑटोनगर येथील पार्टी पेपर शॉट्स तयार करणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागली. शनिवारी रात्री ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. ऑटोनगर परिसरात सोनाक्षी इनोव्हेशन नामक कारखाना आहे. या कारखान्यात पार्टी पेपर शॉट्स व स्पार्कल कँडल तयार करण्यात येत होत्या. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा कारखाना बंद होता. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास कारखान्यातून मोठा आवाज आला. त्यानंतर थोड्या वेळात आग दिसून आली. रखवालदाराने त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पाण्याच्या बंबासह जवान दाखल झाले. माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांचे सहकारीही घटनास्थळी दाखल झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.