अफगाणिस्तानच्या 500 प्रकल्पांमध्ये सहभाग : भारत
अन्नधान्यापासून औषधांपर्यंत केले सहाय्य : युएनएससीत मांडली भूमिका
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
भारताने मागील काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा केली आहे. याचबरोबर अफगाणिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये भारत सरकारच्या मदतीने 500 प्रकल्प राबविले जात आहेत. चालू वर्षाच्या प्रारंभी विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी दुबईत अफगाणिस्तानचे काळजीवाहू विदेशमंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांची भेट घेतली होती. भारताने तालिबान राजवटीसोबत द्विपक्षीय संबंधांशी निगडित मुद्द्यांवर चर्चा केली आहे. याचबरोबर दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान विशेष संबंध भारताच्या वर्तमान संलग्नतेचा ‘आधार’ राहिला असल्याचे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी काढले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तानने द्विपक्षीय संबंधांसोबत क्षेत्रीय विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. अफगाणिस्तानाच्या लोकांसोबत जोडले जाण्याप्रकरणी आणि समर्थन केल्याप्रकरणी भारतीय नेतृत्वाचे कौतुक करत आभार तालिबानच्या राजवटीने मानले आहेत. भारत अफगाणिस्तानमध्ये जारी मानवीय सहाय्य कार्यक्रमांसोबत नजीकच्या भविष्यात विकास प्रकल्पांमध्ये सामील होण्यावर विचार करणार असल्याची माहिती हरीश यांनी सुरक्षापरिषदेत दिली आहे. मिसरी अन् मुत्ताकी यांची भेट ही 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची राजवट सत्तेवर आल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला हा सर्वात उच्चस्तरीय संपर्क होता.
भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान शतकांपेक्षा जुने नाते राहिले आहे. शेजारी देश म्हणून भारत आणि अफगाणिस्तानच्या लोकांदरम्यान एक विशेष नाते आहे, जे देशासोबत आमच्या वर्तमान संलग्नतेचा आधार राहिले आहे. भारत अफगाणिस्तानच्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे आहणि देशात स्थिरता अन् शांतता कायम राखण्यासाठी क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सक्रीय स्वरुपात सामील राहिला आहे. आमचा व्यापक दृष्टीकोन अफगाणिस्तानच्या लोकांना मानवीय सहाय्य प्रदान करणे आणि अफगाणिस्तानात वास्तविक अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायादरम्यान विविध मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या चौकटीच्या अंतर्गत सर्वसहमती तयार करणे असल्याचे हरीश यांनी म्हटले आहे.
दोहा, मॉस्को फॉरमॅट आणि अन्य व्यासपीठांवरुन संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकांमध्ये भारताची भागीदारी ‘अफगाणिस्तानात शांतता, स्थिरता आणि विकासाला सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आरोग्य, अन्नसुरक्षा, शिक्षण, क्रीडा अन् दक्षता विकासाच्या क्षेत्रात अफगाणिस्तानच्या लोकांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांसाब्sात भारत काम करत अहे. 2001 पासून भारत अफगाणिस्तानच्या पुनउ&भारणीसाठी प्रतिबद्ध आहे. आमच्या विकास भागीदारीत अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये फैलावलेले 500 हून अधिक प्रकल्प सामील आहेत. ऑगस्ट 2021 पासून आतापर्यंत भारताने अफगाणिस्तानला 27 टन मदतसामग्री, 50 हजार टन गहू, 40 हजार लिटर किटकनाशक आणि 300 टनाहून अधिक औषधे अन् वैद्यकीय उपकरणे पुरविली आहेत अशी माहिती हरीश यांनी सुरक्षा परिषदेत बोलताना दिली आहे.