प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत सहभाग नोंदवा
कोल्हापूर :
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2021-22 पासून राबविली जात आहे. उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था तसेच गट लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश
नवीन व कार्यरत प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यास सहाय्य. कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन बळकट करुन संघटीत पुरवठा मुल्य साखळीशी जोडणे. सामाईक पायाभूत सुविधा, साठवणुक, पॅकेजिंग, विपणन आदी सेवांचा प्रक्रिया उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी तांत्रिक,व्यावसायिक व आर्थिक सहाय्याचा लाभ व नाशवंत व मागणी अभावी वाया जाणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाणार आहे.
देशांतर्गत नाशवंत शेतमालाचे रुपांतर प्रक्रिया उत्पादनामध्ये करण्यावर भर. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ याला प्राधान्य तसेच ऱ्दह ध्अझ् उत्पादने पात्र. जीआय मानांकन प्राप्त व पारंपरिक उत्पादनांना प्राधान्य देवून जागतिक दर्जाची व निर्यातक्षम उत्पादने तयार करण्यावर भर. सामायिक पायाभूत सुविधेचा आणि मूल्यसाखळीचा या योजनेतून लाभ होणार असून समूह आधारित मॅन्युफॅक्चरिंग हब निर्मिती करण्यावर भर. तारण पर्यायी योजना, ब्रॅंडिंग आणि मार्केटिंगसाठी मदत होणार आहे. योजनेचे अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
- 850 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत जिह्यात आतापर्यंत 850 कर्ज मंजूर लाभार्थ्यांपैकी 493 लाभार्थ्यांना श्ध्इझ्घ् मार्फत 41.80 कोटी रुपये अनुदान जमा झाले आहे. सन 2024-25 अंतर्गत वैयक्तिक घटकांतर्गत 300 (72 टक्के लक्षांक साध्य) बँक मंजूर आहेत. झ्श्इश्ं अंतर्गत एकूण ऑनलाईन 1 हजार 314 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील 850 प्रस्ताव मंजूर असून बँक व विविध स्तरावर 275 प्रस्ताव छाननीसाठी प्रलंबित आहेत.
- योजनेत समाविष्ठ प्रक्रिया उद्योग
सर्व प्रक्रिया उद्योग अथवा आजारी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगही बँक कर्ज उपलब्ध होत असल्यास पात्र. पारंपरिक, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन
- वैयक्तिक लाभार्थी
प्रगतशील शेतकरी, नव उद्योजक, बेरोजगार युवक, महिला वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, गैर सरकारी संस्था, सहकारी संस्था, खाजगी कंपनी आदी सहभागी होऊ शकतात.
- गट लाभार्थी
शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्था प्रस्ताव सहाय्यासाठी पात्र आहेत.योजनेमध्ये नाशवंत फळपिके, कोरडवाहू पिके, भाजीपाला, अन्नधान्ये, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाला पिके, गुळ इत्यादींवर आधारित उत्पादने, दुग्ध व पशु उत्पादने, सागरी उत्पादने, मांस, वन उत्पादने आदी उत्पादनांचा समावेश आहे. योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन संगणकांसोबत मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येतो.