For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी व्हा

07:50 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी व्हा
Advertisement

शहापूर येथे जागृती बैठकीचे आयोजन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

भाषावार प्रांतरचनेनंतर मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळला जातो. यावर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काळादिन पाळला जाणार असून नागरिकांनी कडकडीत हरताळ पाळत, व्यवसाय, उद्योग बंद ठेवून मराठी भाषिकांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.

Advertisement

गुरुवारी शहापूर येथे व्यापक जनजागृती करून गाडे मार्ग येथील श्रीराम मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर संजय शिंदे होते. प्रशासनाला भाषिक अस्मिता काय असते हे दाखवून देण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने काळ्यादिनाच्या फेरीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवत येणारा काळादिवस ताकदीने आणि शांततापूर्ण मार्गाने पाळण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी नेताजी जाधव, राजेंद्र बिर्जे, महादेव पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, गुंडू कदम, किरण हुद्दार, शेखर तळवार, सूरज चव्हाण, सागर पाटील, सुनील बोकडे, विलास लाड, रमेश चौगुले, विक्रांत लाड, सुधीर कालकुंद्रीकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.