For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

काळादिनाच्या फेरीला बहुसंख्येने उपस्थित रहा

06:45 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
काळादिनाच्या फेरीला बहुसंख्येने उपस्थित रहा
Advertisement

युवा समिती सीमाभागाचे आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

केंद्र सरकारने बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनांना तिलांजली देत 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती केली. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिक जनता हा दिवस काळादिन म्हणून सुतक पाळते. यावर्षीही काळादिनाच्या फेरीमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागाच्यावतीने करण्यात आले.

Advertisement

पिरनवाडी येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पिराजी मुचंडीकर होते. नगरसेवक व संघटनेचे खजिनदार शिवाजी मंडोळकर यांनी मागील 70 वर्षांपासून चालू असलेल्या लढ्याला न्याय द्यायचा असेल तर मराठी भाषिकांची एकजूट महत्त्वाची असून येत्या 1 नोव्हेंबर रोजी फेरीमध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन मराठी भाषिकांची ताकद वाढविण्याचे आवाहन केले.

कार्याध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, 17 जानेवारी 1956 साली 40 लाख मराठी जनतेवर अन्याय झाला. सीमा भागातील मराठी भाषिकांनी अनेक आंदोलने, चळवळी, हुतात्मे दिले. तुरुंगवास भोगला. परंतु अद्याप यश आलेले नाही. या अन्यायविरोधोत ताकद दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष पिराजी मुचंडीकर यांनी सर्वांना उपस्थित राहण्यास सांगितले.

पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 नोव्हेंबरला एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अशोक घगवे, शिवजी हावळाण्णाचे, रणजित हावळण्णाचे, अभिजीत मजूकर, प्रवीण गुंडोजी, सुशांत देसाई, विनायक पवार, निलेश शहापूरकर, जोतिबा येळ्ळूरकर, राजू पाटील, नारायण मुचंडीकर, विजया पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.