पार्थ खोत ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक
कोल्हापूर
करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील पार्थ भारत खोत यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पार्थ ने अंतिम सामन्यात केरळच्या ताजल रहमान याला सलग दोन फेरीत पराभूत करुन सुवर्णपदकावर नाव कोरले.
सुरुवाती पासूनच पार्थ ने प्रतिस्पर्धांवर वर्चस्व ठेवले होते. सलग दोन फेरीत पार्थने विजय मिळविला. तत्पुर्वी उपात्य सामन्यात पार्थने इमरान राजा (जम्मू-काश्मिर) यालाही सलग दोन फेरीतच पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. पार्थने वयाच्या अवघ्या आठराव्या वर्षी महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. कसबा बीड येथील ज्ञान विद्यान शाळेत 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या पार्थने यापुर्वीही विविध स्पधांर्मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. जुन्या पिढीतील कुस्ती वस्ताद रंगराव कळंत्रे यांचा नातू असलेल्या पार्थला निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजीराव कळंत्रे, नामदेव पाडेकर, भारत कळंत्रे-खोत व क्रिडा शिक्षक रवी दिंडे यांचे मार्गदर्शन लाभले.