For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पार्थ जिंदाल बनले जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे चेअरमन

06:49 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पार्थ जिंदाल बनले जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे चेअरमन
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

भारतातील कार निर्माती कंपनी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया यांना पार्थ जिंदाल यांच्या रुपाने नवे चेअरमन प्राप्त झाले आहेत. नवे चेअरमन इलेक्ट्रीक वाहन आणि स्थानिक स्तरावर उत्पादन वाढवण्यावर भर देणार आहेत.पार्थ जिंदाल यांनी आपल्या पदाचा कारभार तात्काळ स्वीकारला आहे. इलेक्ट्रीक कार, नव्या मॉडेल सादरीकरणावर लक्ष देतानाच भारतात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यावरही कंपनीचा यापुढे भर असेल.

आधीपासून विविध पदांवर जबाबदारी

Advertisement

पार्थ हे आधीपासूनच जेएसडब्ल्यू एमजीमध्ये संचालक मंडळावर आहेत. समूह व चीनमधील एसएआयसी मोटर यांच्यात संयुक्त भागीदारी झाल्यापासून ते कंपनीत सक्रीय आहेत. उत्पादन धोरण, उत्पादन वाढवणे व भारतातच कामांना अधिक प्राधान्य देण्यावर ते ठाम आहेत. ते जेएसडब्ल्यू सिमेंट व जेएसडब्ल्यू पेंटस यांचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. याशिवाय जेएसडब्ल्यू ड्युलक्सचेही चेअरमन आहेत. जिंदाल जेएसडब्ल्यू एनर्जीचेही संचालक आहेत. तसेच क्रीडाशीसंबंधीत जेएसडब्ल्यू स्पोर्टसचे संस्थापक व दिल्ली कॅपिटलचे चेअरमन व सहमालकही आहेत.

इलेक्ट्रीक कार क्षेत्रावर लक्ष

येत्या काळात कंपनीच्या इलेक्ट्रीक कार्स क्षेत्रात नवनवीन मॉडेल सादर करण्यावर भर दिला जाणार आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन बाजारात नवी उत्पादने सादर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचे नियोजनही असल्याचे पार्थ जिंदाल यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.