पार्थ चटर्जी, अर्पिता मुखर्जी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
07:00 AM Aug 19, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
कोलकाता / वृत्तसंस्था
Advertisement
पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना ईडीने गुरुवारी कोलकाता शहर सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 31 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिक्षक भरती घोटाळय़ातील मुख्य संशयित आरोपी पार्थ चटर्जी यांच्याबरोबरच अर्पिता मुखर्जी हिची कोठडी गुरुवारी संपली. त्यानंतर दोघांचीही पुन्हा 14 दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली. यापूर्वीही दोघांच्या न्यायालयीन कोठडीत दोनदा वाढ करण्यात आली आहे. पार्थच्या जामिनासाठी उच्च न्यायालयातही अपील करण्यात आले होते. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाकडून दोघांचीही चौकशी सुरू असल्याने तपास यंत्रणांकडून पार्थ यांच्या जामिनाला विरोध केला जात आहे.
Advertisement
Advertisement
Next Article