For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कला अकादमी सिलिंगचा काही भाग कोसळला

01:04 PM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कला अकादमी सिलिंगचा काही भाग कोसळला
Advertisement

पणजी : कोट्यावधी ऊपये खर्च कऊन नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या छताचा सिलिंगचा काही भाग सोमवारी सकाळी अचानक कोसळला आहे. विरोधकांकडून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकूणच कला अकादमीची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असून नाट्याकलाकार मंत्री गोविंद गावडे यांच्या नावाने बोटे मोडीत आहेत. गेल्या शनिवारी लागलेल्या अवेळी पावसामुळे कला अकादमीच्या छताचा भाग कोसळल्याने प्रश्न पुन्हा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दीनानाथ मंगेशकर नाट्यागृहाच्या मागील बाजूच्या छताचा काही भाग कोसळल्याने सोमवारी सकाळी खळबळ माजली. छताचे तुकडे जमिनीवर कोसळले. छतामध्ये घातलेल्या लोखंडी सळ्या बाहेरून स्पष्ट दिसत होत्या. नाट्यागृहात पाणी भरले होते. नाट्यागृहातील खूर्च्या भिजून गेल्या होत्या. रंगमंचावरही पाणी गळती सुरु होती. याबाबत पत्रकारांना माहिती मिळताच त्यांनी कला अकादमीकडे धाव घेतली मात्र त्यांना गेटवर अडवून गेटला कुलुप लावण्यात आले. जुलै 2023 मध्ये कला अकादमीच्या खुल्या सभागृहाचा भाग कोसळला होता. इफ्फी संपल्यानंतर काही दिवसांनी मंगेशकर नाट्यागृहातील छताचा काही भाग कोसळून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळत होते. त्यानंतर कला अकादमीत साप घुसला होता. आता पुन्हा एकद छत कोसळल्याने पुन्हा वातावरण तापत चालले आहे. कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर नाट्यामंदिरातील साऊंड सिस्टमही खराब झाल्याने अनेक कलाकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोट्यावधी ऊपये खर्च करून साऊंड सिस्टम बसविण्यात आली, मात्र ती आता कार्यरत नसल्याचे कलाकार सांगतात. कला अकादमीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला साऊंड सिस्टम बाहेऊन आणावी लागत आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांनी मागितला अहवाल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीचा अहवाल मागविला असून त्याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सांगितले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंत शेट तानावडे यांनी सांगितले. चार्ल्स कुर्रैया फाऊंडेशनच्या लोकांना बोलावून झालेल्या कामाचे ऑडिट करावे अशी मागणी गोवा फॉरर्वडेचे दुर्गादास कामत यांनी केली आहे. 75 कोटी ऊपये खर्च करून कला अकादमीचे कसले काम केले ते लोकांना कळेल. अन्यथा एक दिवस पूर्ण कला अकादमी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकादमीच्या  छताचा छताचा भाग कोसळण्याची ही तीसरी वेळ आहे, असेही दुगादस कामत यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.