For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

रिबेल मूनचा दुसरा भाग लवकरच

06:17 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिबेल मूनचा दुसरा भाग लवकरच

अॅक्शनने युक्त ट्रेलर सादर

Advertisement

जॅक स्नायडरचा स्पेस अॅडव्हेंचर चित्रपट रिबेल मूनचा दुसरा भाग एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या याचा ट्रेलर जारी करण्यात आला असून यात अॅक्शन आणि रोमांचचा मोठा डोस दिसून येत आहे. रिबेल मूनचा पहिला भाग मागील वर्षी 22 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. सोफिया बुटेला रिबेल मूनमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

रिबेल मून- पार्ट वन : अ चाइल्ड ऑफ फायरमध्ये सोफियाने कोरा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ती अंतराळातील एका शांत ग्रहावर लोकांसोबत राहते. उत्तम फायटर असलेली कोरा ही बंडखोरी वृत्तीची आहे. कोरा ब्रह्मांडात मदरवल्डंच्या विरोधात बंड करते आणि ब्रह्मांडातील सर्वात मोठ्या योद्ध्यांना स्वत:च्या लढाईसाठी एकत्रण आणते. पहिल्या भागात कोरा योद्ध्यांना घेऊन गावात पोहोचत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दुसरा भाग द स्कारगिवरमध्ये कहाणी त्यापुढे जाणार आहे. तसेच कोराच्या भूतकाळातील काही पानं उघड होणार आहेत.

Advertisement

ट्रेलरमध्ये याची झलक दिसून येते. चित्रपटात ऐड स्क्राइन  मदरवर्ल्डचा विश्वासू आणि बेलिसेरियस एटिकसच्या व्यक्तिरेखेत आहे. कोरालाच स्कारगिवर म्हटले जाते, कारण तिने बेलिसेरियस विरोधात बंड केले होत. बेलिसेरियसने कोराला मुलीप्रमाणे वाढवत योद्धा केले होते. परंतु कोरा त्याचा द्वेष करत असते आणि त्यामागे एक कारण असते.

Advertisement

रिबेल मून पार्ट 2 : द स्कारगिवर 19 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागावरून मोठी उत्सुकता आहे. रिबेल मून हा अकीरा कुरोसावाच्या स्टार वॉर चित्रपटांवर प्रेरित आहे.

Advertisement
Tags :
×

.