For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिलबी चित्रपटात पर्ण पेठे मुख्य भूमिकेत

07:00 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिलबी चित्रपटात पर्ण पेठे मुख्य भूमिकेत
Advertisement

स्वप्नील जोशी, प्रसाद ओक झळकणार

Advertisement

आगामी काळात मराठी कलाविश्वात नवनवीन धाटणीचे आणि वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘जिलबी’ हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांनी स्वत:च्या अभिनयाने मनोरंजनाच्या या ‘जिलबी’चा खुसखुशीतपणा वाढवला आहे. या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून यातील कलाकारांचा लूक लक्ष वेधून घेणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन कांबळे यांनी केले आहे. या चित्रपटात शिवानी सुर्वे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पोस्टरमध्ये प्रसाद, स्वप्नील आणि शिवानीचा जबरदस्त लुक पहायला मिळत आहे. आता या तिघांभोवती नेमकं कसलं जाळं पसरलंय याचा उलगडा चित्रपट पाहिल्यावरच होणार आहे. स्वप्नील आणि प्रसाद एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा अन् संवादलेखन मच्छिंद्र बुगडे यांनी केले आहे. तर छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. रुपा पंडित आणि राहुल दुबे हे याचे सहनिर्माते आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.