For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संसदेचे अधिवेशन 18 जूनपासून शक्य

06:36 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
संसदेचे अधिवेशन 18 जूनपासून शक्य
Advertisement

 लोकसभाध्यक्षांची निवड 20 जूनला अपेक्षित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 18 जूनपासून सुरू होण्याची शक्मयता आहे. नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनंतर अधिवेशनाची सुऊवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांचा शपथविधी तीन दिवस चालणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 20 जून रोजी होऊ शकते. तर 21 जून रोजी राष्ट्रपतींचे अभिभाषण अपेक्षित आहे. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. तर, अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची दोन्ही सभागृहांना ओळख करून देतील.

Advertisement

नरेंद्र मोदी यांनी रविवार, 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशिवाय भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआने 293 जागा जिंकल्या आहेत. तर, ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनी 234 जागा जिंकल्या. तर इतर पक्षांना 17 जागा मिळाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.