For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटच्या विकासार्थ क्लबांसमवेत काम करण्याचा ‘परिवर्तन’ पॅनेलचा संकल्प

07:55 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेटच्या विकासार्थ क्लबांसमवेत काम करण्याचा ‘परिवर्तन’ पॅनेलचा संकल्प
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव

Advertisement

वन-म्हावळींगेत गोवा क्रिकेट संघटनेने क्रिकेट मैदानासाठी 45 कोटी आतापर्यंत जमीन संपादनासाठी खर्च केले आहे. ते सोडून देणे आणि धारगळ येथे  स्टेडियम बांधणे जीसीएला शक्य नाही. एवढे नुकसान जीसीए करून घेणार नाही, असे जीसीए निवडणुकीसाठी उतरलेले परिवर्तन पॅनेलचे प्रमुख रोहन गावस देसाई म्हणाले.

आपले पॅनेल जिंकून आल्यानंतर वन-म्हावळींगेतच जीसीएच्या स्टेडियमची निर्मिती करणार आहे. थिवीत 5 कोटी, धारगळ येथे 10 आणि वन-म्हावळींगे 45 कोटी असे 60 कोटी जीसीएने क्रिकेट मैदानासाठी खर्च केले आहेत. ‘क्रिकेट फस्ट’ हा उद्देश समोर ठेऊनच आम्ही या निवडणुकीत उतरलो असल्याचे रोहन गावस देसाई म्हणाले. यावेळी परिवर्तनपॅनेलच्या जाहीरनाम्याचेही अनावरण करण्यात आले.

Advertisement

गोव्यात स्वत:च्या मालकीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमही नाही ही तर गोव्याच्या क्रिकेटची शोकांतिका आहे. जिथे क्रिकेट संस्कृती नाही तिथे स्टेडियम आहेत पण आमच्या गोव्यात नाहीत. वन-म्हावळींगेत स्टेडियम बांधण्यासाठी आम्ही क्लबांशी सविस्तर चर्चा केली असून, क्लबांचाही आम्हाला पाठिंबा आहे. असे देसाई म्हणाले. राज्यातील क्रिकेटला प्राधान्य देणे हे आमच्या परिवर्तन पॅनेलचे ध्येय आहे. राज्यात दर्जेदार क्रिकेटपटू निर्माण करणे, चांगली बेंच स्ट्रँग्थ असणे, साधनसुविधांची निर्मिती करणे आणि चांगले क्रिकेट प्रशिक्षक आणणे हे आमच्या पॅनलचे उद्देश असून यासाठी आम्ही रिंगणात उतरलो आहोत, असे सचिवपदाचे उमेदवार दया पागी म्हणाले. आमच्या पॅनलमध्ये ग्राऊंड लेव्हलवर काम केलेले उमेदवार आहेत. सकारात्मक विचार करूनच आम्ही पुढे जात आहोत. बहुमत आमच्याकडेच असून आमचे पॅनल निश्चितच विजयी होणार असल्याचे अध्यक्षपदाचे उमेदवार महेश कांदोळकर यावेळी म्हणाले.

जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्यो

? आंतरराष्ट्रीय स्टेडियमची वन-म्हावळींगेत निर्मिती.

? सर्व वयोगटातील संघांची निवड केवळ गुणवत्तेवर.

? आंतर क्लब स्पर्धांचे पद्धतशीरपणे आयोजन.

? क्रिकेटच्या विकासार्थ क्लबांच्या सूचनांचे पालन.

?               जीसीएच्या सर्व प्राप्ती आणि खर्चात पारदर्शकता.

? तालुका पातळीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी क्लबांना हंगामाच्या आरंभालाच आर्थिक मदत.

Advertisement
Tags :

.