For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परिते म्हाळूंगे रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात एक ठार

03:42 PM Jun 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
परिते म्हाळूंगे रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात एक ठार
Parite Mhalunge road accident
Advertisement

भोगावती / प्रतिनिधी

पशुखाद्य वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.विजय शंकरराव कांझर वय ४५ रा निगवे खा ता करवीर असे मयताचे नाव आहे. परिते ते म्हाळूंगे रस्त्यावरील देवर्डेकर खडीवर शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला.दुचाकीसह मयताचा उजवा पाय तुटून ट्रकच्या पुढील चाकात अडकला होता इतका हा अपघात भिषण होता.

Advertisement

भोगावती परिसरातील दूध संस्थामध्ये पशुखाद्य उतरून ट्रक क्रमांक एम एच ११ एम ५७६१ म्हाळूंगे गावाकडे जात होता.तर विजय कांझर हा स्कुटी क्रमांक एम एच ०९ सी व्ही २४८३ दुचाकीवरून परितेकडे येत होता.देवर्डेकर खडीवर आल्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.त्यामुळे ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने विजय कांझर जागीच ठार झाले. तर त्यांचा उजवा पाय तुटून दुचाकीसह ट्रकच्या पुढील उजव्या चाकाखाली अडकून पडला होता.

अपघाताची वर्दी परिते पोलीस पाटील सौ पुजा रणजित पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार करवीर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फौजदार युवराज फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला.तर घटनास्थळी असणारी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन सुमारे दोन तास कोंडी झालेली वाहतूक सुरळीत केली.ट्रक देवदत्त चौगले रा कौलव यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
-------/

Advertisement

Advertisement
Tags :

.