For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 हजार वर्षापासून दडले होते पॅरिसचे रहस्य

06:40 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
2 हजार वर्षापासून दडले होते पॅरिसचे रहस्य
Advertisement

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुमारे 2 हजार वर्षे जुनी एक भिंत मिळाली आहे. ही भिंत शहराच्या प्रारंभाशी निगडित एका जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळवून देण्यास मदत करू शकते. हा शोध पॅरिसच्या इले दे ला सिते भागात लागला आहे. येथे हॉटेल-दियू रुग्णालयाखाली उत्खननादरम्यान सुमारे 20 मीटर लांब दगडी आणि लाकडी भिंत मिळाली आहे. ही प्राचीन ल्यूटेशियाच्या सुरक्षा भिंतीचा हिस्सा असू शकते, असे पुरातत्वतज्ञांना वाटते. परंतु याचे योग्य वयोमान आणि वापराची अद्याप आणखी संशोधन होणे शिल्लक आहे.

Advertisement

प्राचीन पॅरिसची वस्ती अखेर कोठे होते याची चर्चा दीर्घकाळापासून चालत असल्याने हा शोध महत्त्वाचा आहे. त्य ा काळात येथे पेरिसी नावाचा गॉलिक समुदाय राहत होता आणि त्याच्या वस्तीला ल्यूटेशिया म्हटले जाते. एका मान्यतेनुसार ल्यूटेशिया इले दे ला सिते येथे होती. तर दुसऱ्या थेअरीनुसार ही वस्ती पॅरिसच्या पश्चिमेला नांतेर भागात होती. आता इले दे ला सिते यो मिळालेल्या या भिंतीने या चर्चेला पुन्हा केंद्रस्थानी आणले आहे. मिळालेली भिंत जमिनीपासून सुमारे 4 मीटर खाली होती. याची उंची जवळपास 1 मीटर आहे. याला हॉटेल-दियू हॉस्पिटलच्या एका अंगणात खोदकामादरम्यान शोधण्यात आले आहे.

या ठिकाणावर पुरातात्विक उत्खनन फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले होते. भिंत दग

Advertisement

 

ड अन् लाकडाने निर्मित आहे. यावर आग लागण्याच्या खुणा देखील मिळाल्या आहेत. जळालेल्या लाकडाच्या काही हिस्स्यांचे कार्बन डेटिंग करण्यात आले. यानुसार हे अवशेष सुमारे ख्रिस्तपूर्व 10 पासून ख्रिस्तपूर्व 200 सालादरम्यानचे असू शकते. त्याकाळात ख्रिस्तपूर्व 52 मधील ल्यूटेशिया युद्ध देखील येते.

भिंतीवर आगीच्या खुणा मिळाल्याने या शोधाला आणखी लक्षपूर्वक पाहिले जातेय. ज्युलियस सीझरने स्वत:चे पुस्तक ‘गॉलिक वॉर्स’मध्ये रोमन सैन्याशी लढाईपूर्वी गॉल्सने स्वत:च्या वस्तीला आग लावली होती असे लिहिले आहे. परंतु केवळ आगीच्या खुणा मिळाल्याने भिंत त्या घटनेशी निगडित होती असे ठामपणे म्हणता येणार नाही.

याचमुळे सध्या आणखी संशोधन करावे लागणार आहे. भिंत कधी निर्माण झाली होती आणि याचा वापर कोणत्या कामासाठी केला जात होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. ल्यूटेशियाचा उल्लेख ज्युलियस सीझरच्या पुस्तकात मिळतो. हे सीन नदीच्या एका बेटावर वसलेले होते आणि तेथून पूलांद्वारे पोहोचता येऊ शकत होते असे त्याने म्हटले होते.

 

याचमुळे इले दे ला सिते याला दीर्घकाळापासून प्राचीन पॅरिसचे संभाव्य ठिकाण मानले जात राहिले आहे. परंतु नांतेर मध्ये देखील जुन्या गॉलिक काळातील वस्तीचे पुरावे मिळाले आहेत. याचमुळे खरी ल्यूटेशिया नांतेरमध्ये असू शकते असे काही पुरातत्वतज्ञांचे मानणे आहे.

फ्रान्सच्या संस्कृती मंत्रालयानुसार ही भिंत प्राचीन ल्यूटेशियाला समजून घेण्यास महत्त्वाची ठरू शकते. परंतु याला अंतिम पुरावा मानणे घाईचे ठरेल. पुढील उत्खनन आणि तपासणीतून ही भिंत कोणत्या कामासाठी तयार करण्यात आली होती हे कळणार आहे. याचा प्राचीन ल्युटेशियाशी किती संबंध आहे हे कळू शकणार आहे. सध्या पॅरिसच्या जुन्या इतिहासाला समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांच्या हाती एक नवा  आणि महत्त्वाचा पुरावा लागला हे मात्र या शोधामुळे स्पष्ट आहे.

Advertisement
Tags :

.