महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनुष अगरवालला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट

06:27 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येत्या जून-जुलै दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अनुष अगरवालने अश्वदौड या क्रीडा प्रकारात तिकिट निश्चित केले आहे. अश्वदौड क्रीडा प्रकारातील ड्रेसेजमध्ये अनुष अगरवाल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करेल, अशी माहिती अखिल भारतीय अश्वदौड फेडरेशनने दिली आहे.

Advertisement

गेल्या वर्षी हांगझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अनुष अगरवालने वैयक्तिक अश्वदौड ड्रेसेज प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले होते. आंतरराष्ट्रीय अश्वदौड फेडरेशनच्या पोलंड, नेदरलँड्स, जर्मनी तसेच बेल्जियम येथे झालेल्या अश्वदौड स्पर्धांमधील कामगिरीचा आढावा घेत कोटा पद्धतीनुसार अनुष अगरवालला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट मिळाले आहे. यापूर्वी ऑलिम्पिक इतिहासामध्ये 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये दर्या सिंगने, 1996 च्या अॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये इंद्रजीत लांबाने, 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये इम्तियाज अनिसने, 2022 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये फौद मिर्जाने भारताचे अश्वदौड प्रकारात प्रतिनिधित्व केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article