‘शक’मधून परतणार परिणीति
दीर्घकाळापासून अभिनेत्री परिणीति चोप्राचे नाव एका मिस्ट्री थ्रिलर वेबसीरिजवरून चर्चेत आहे. या सीरिजचे नाव ‘शक’ असून याच्या माध्यमातून परिणीति दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स इंडियाकडून या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सकडून या सीरिजचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. ही सीरिज 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘शक : ट्रस्ट नो वन’ या सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांना परिणीतिचा दमदार अभिनय पुन्हा पाहता येणार आहे.
या सीरिजची निर्मिती सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केली आहे. मल्होत्रा यांच्याकडून पुढील काळात मधुबालाचा बायोपिक देखील निर्माण केला जाणार आहे. तर दिग्दर्शन रेनसिल डी सिल्वा यांनी केले आहे. परिणीति चोप्रा या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अन्य महत्त्वाच्या भूमिकांमध्ये ताहिर राज हुसैन, सोनी राजदान, जेनिफर विंगेट, व्यास सुमित आणि हर्लिन सेठी हे कलाकार दिसून येणार आहेत. या सीरिजची कहाणी मुलांच्या बेपत्ता होण्याविषयीच्या मुद्द्यावर आधारित असल्याचे समजते.