Parbhani Temple Collapse सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू अनेक भाविक गंभीर जखमी,परभणीतील दुर्दैवी घटना
04:41 PM Jun 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज (शनिवार) एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे बांधकाम सुरू असताना अचानक पिलरसह छताचा काही भाग कोसळला आणि एकच गोंधळ उडाला. आज शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती, त्यामुळे अनेक भाविक घाबरले. या घटनेत ८ ते १० भाविक गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरात शनिवार निमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. याच दरम्यान, मंदिर परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचा एक मोठा भाग अचानक कोसळला. पिलर आणि छताचा भाग थेट खाली उपस्थित असलेल्या भाविकांवर पडला. या दुर्घटनेत 8 ते 10 भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाविकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
या घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृतांचा आकडा नेमका किती आहे याची माहिती मिळू शकली नाही. अचानक ही दुर्घटना घडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. उपस्थित भाविकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंदिराच्या छताचा मोठा भाग कोसळल्याने
Advertisement
काही भाविक अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिह्न
यशवाडी येथील या हनुमान मंदिरात गेल्या काही दिवसांपासून सभा मंडपाचे बांधकाम सुरू होते. आज शनिवार असल्याने मजुरांचे काम आणि भाविकांची वर्दळ एकाच वेळी सुरू होती. मात्र, हे बांधकाम सुरू असतानाच अचानक पिलर आणि छताचा भाग कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Advertisement