For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी आमदार परशुराम उपरकर उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार?

11:01 AM May 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
माजी आमदार परशुराम उपरकर उबाठा शिवसेनेत प्रवेश करणार
Advertisement

३ मे रोजी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार, सूत्रांची माहिती

Advertisement

कणकवली/ प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फारकत घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार परशुराम उपरकर कोणता झेंडा हाती घेणार? याबाबत चर्चा होती. श्री. उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले होते. मात्र, सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार श्री. उपरकर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ३ मे रोजी कणकवलीत होणाऱ्या जाहिर सभेवेळी हा प्रवेश होणार असल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत श्री. उपरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यानंतर श्री. उपरकर यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. नंतरच्या कालावधीत शिवसेना अतंर्गत वादातून श्री. उपरकर यांनी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला होता, मात्र, गेल्या दिड वर्षापासुन ते मनसेपासूनही अंतर राखून होते. दोन महिन्यांपुर्वी त्यांनी मनसेशी फारकत घेतली. मनसेनेही त्यांचा पक्षाशी संबंध नसल्याचे पत्रक काढून जाहिर केले. त्यानंतर कुडाळ येथे झालेल्या मेळाव्यात सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले होते.

मात्र राज्यातील व जिल्हयातील बदलत्या राजकीय स्थितीत श्री. उपरकर हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. यात माजी मंत्री अनिल परब यांचा पुढाकार असल्याचे समजते. श्री. उपरकर यांच्या प्रवेशामुळे जुन्या शिवसैनिकांत उत्साह आहे. मात्र, त्यांच्या प्रवेशामुळे कणकवली देवगड विधानसभेत शिवसेनेकडून श्री. उपरकर यांचे नाव पुढे येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तशा प्रकारची प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.