For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरा अॅथलेटिक्स : भारताचे भालाफेकीत वर्चस्व

06:00 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
पॅरा अॅथलेटिक्स   भारताचे भालाफेकीत वर्चस्व
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

सध्या येथे चालू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रां प्रि 2025 च्या दुस्रया दिवशी भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात रिंकू हु•ा हा पुऊषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्टार म्हणून उदयास आला आहे. रिंकूने गोव्यातील 22 व्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेमधील विजयानंतर आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर आता वरील स्पर्धेत 60.26 मीटरच्या प्रभावी भालाफेकीसह इ-46 गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

या गटात रौप्यपदक मिळालेला श्रीलंकेच्या गामिनी केतवाला (56.88 मीटर भालाफेक) आणि उझबेकिस्तानचा एल्योरबेक एल्माटोव्ह (43.01 मीटरसह कांस्यपदक) या दोन खेळाडूंना त्याने मागे टाकले. पुऊषांच्या भालाफेकीतील इ-12, इ-37, इ-42 आणि इ-43 या संयुक्त प्रकारातही भारताचे वर्चस्व अधोरेखित झाले. तेथेही भारतीय खेळाडूंनी भरपूर पदके जिंकली.

Advertisement

पुष्पेंद्र सिंगने 57.57 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर मोहितने 45.45 मीटरसह रौप्यपदक आणि जसवंतने 45.94 मीटरसह कांस्यपदक पटकावले आणि यजमानांसाठी आणखी एक क्लीन स्वीप नोंदवला. इतर फील्ड इव्हेंटमध्ये ही गती कायम राहिली. रितेंदरने पुऊषांच्या भालाफेकीतील इ40/इ41 प्रकारात 30.33 मीटर भालाफेक करून भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक मिळवले. पुऊषांच्या थाळीफेकीतील इ56/इ57 गटात भारताच्या अतुल कौशिकने 43.92 मीटर फेक करून विजय मिळवला, तर राम कुमार यादवने 30.59 मीटरसह रौप्यपदक पटकावले.

Advertisement
Tags :

.