कोलगाव सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी पपू ठिकार आणि चंद्रकांत सावंत
ओटवणे : प्रतिनिधी
कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी मनोहर उर्फ पपू धोंडी ठिकार आणि चंद्रकांत जयराम सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.कोलगाव सोसायटीच्या तज्ञ संचालक निवडीसाठी झालेल्या खास बैठकीला कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वीरेंद्र धुरी, सोसायटीचे संचालक मेघश्याम काजरेकर, शुभांगी घोगळे, सलमा बेगम, लक्ष्मण राऊळ, रामचंद्र पालव, बाबुराव चव्हाण, सचिव रामा म्हैसकर, हरिश्चंद्र सावंत, गोपाळकृष्ण फोंडबा आदी शेतकरी, ग्रामस्थ व सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, संदीप गवस यांनी कोलगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे तज्ञ संचालक मनोहर उर्फ पपू धोंडी ठिकार आणि चंद्रकांत जयराम सावंत यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.