For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पप्पू यादवच्या प्रचार कार्यालयावर छापा

07:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पप्पू यादवच्या प्रचार कार्यालयावर छापा
Advertisement

पूर्णियातून लोकसभा निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार

Advertisement

वृत्तसंस्था /पूर्णिया

काँग्रेस बंडखोर व पूर्णियातील अपक्ष उमेदवार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या अर्जुन भवन येथील कार्यालयावर गुऊवारी दुपारी एसडीपीओ पुष्कर कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या  वाहनांची कागदपत्रे तपासली. तसेच प्रचारासाठी सज्ज असलेल्या इतर अनेक वाहनांची परवानगीपत्रे दाखवण्यास सांगितले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना काउंटरवर परवानगी अर्जाची पावती दिल्याची माहिती दिली. या संपूर्ण कारवाईवेळी पप्पू यादव कार्यालयात उपस्थित होते. सर्व विरोधक आपल्याला त्रास देण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करत आहोत. संबंधित वाहनांच्या परवानगीसाठी अर्ज रितसर दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.