पंकज त्रिपाठींच्या कन्येचे पदार्पण
म्युझिक व्हिडिओत झळकणार आशी
पंकज त्रिपाठी यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते, आता त्यांची कन्या आशी देखील अभिनयाच्या क्षेत्रात उतरली आहे. आशीने म्युझिक व्हिडिओ ‘रंग डारो’द्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. रंग डारो या गाण्यात आशी अत्यंत सुंदर दिसून येत आहे.
या गाण्यात तिच्यासोबत प्रभाकर स्वामी दिसून येत आहे. मैनाक भट्टाचार्य आणि संजना रामनारायण यांनी हे गीत गायले आहे. तर अभिनव आर. कौशिकने संगीत दिले आहे. आशी सध्या मुंबईतील एका महाविद्यालयात शिक्षणघेत आहे. तसेच पंकज त्रिपाठी यांच्याप्रमाणेच ती अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहत आहे.
आशीच्या अभिनयाच्या क्षेत्रातील पदार्पणाचा क्षण माझ्यासाठी भावुक आहे. आशीला पडद्यावर पाहणे माझ्या आणि मृदुलासाठी गर्वाची बाब आहे. आशी नेहमीच परफॉर्मिंग आर्ट्सबद्दल उत्सुक राहिली आहे. पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिची सहज अभिव्यक्ती पाहणे आमच्यासाठी अत्यंत खास होते. जर ही तिची पहिली सुरुवात असेल तर तिच्या पुढील प्रवासासाठी मी अत्यंत उत्सुक असल्याचे उद्गार पंकज त्रिपाठी यांनी काढले आहेत.