For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडोनेशियाच्या गावात खड्डयांमुळे दहशत

06:18 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडोनेशियाच्या गावात खड्डयांमुळे दहशत
Advertisement

शेतजमिनींना करतोय गिळंकृत

Advertisement

इंडोनेशियाच्या आचे प्रांतातील पेंडोक बालिक गाव सध्या एका मोठ्या धोक्याला सामोरे जात आहे. येथील जमीन हळूहळू खचू लागली आहे. एक विशाल खड्ड (सिंकहोल) निर्माण झाला असून जो आता सुमारे 3 हेक्टर क्षेत्रात फैलावलेला आहे. हा ख•ा शेतजमिनींना गिळंकृत करत असून गावातील घरांच्या दिशेने वाढत चालला आहे. ड्रोनद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये हे दृश्य अत्यंत भीतीदायक वाटते.

ही समस्या अनेक वर्षांपासून चालत आली असली तरीही 2025 च्या अखेरीस अतिवृष्टी आणि पूरानंतर ही समस्या तीव्र झाली आहे. तज्ञांनुसार जमिनीखाली सबसर्फेस इरोजन असल्याचे ती खचत आहे. या भागातील माती ज्वालामुखीय राखेतून निर्माण झालेली आहे, जी पाण्यामुळे सहजपणे वाहून जाते. पाणी जमिनीत शिरून तिला पोकळ करते, यामुळे वरील मातीचा थर अचानक खचतो. इंडोनेशियात ज्वालामुखींचे प्रमाण अधिक आहे. याचमुळे अशाप्रकारच्या मातीचे भाग तेथे अधिक आहेत. ख•dयाची खोली जवळपास 100 मीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येत असून हा हळूहळू फैलावत आहे आणि आता मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचला आहे.

Advertisement

शेतकरी अन् ग्रामस्थांवर प्रभाव

या गावात सुमारे 800 लोक राहतात, ख•dयाचा काठ आता त्यांच्या घरांपासून केवळ 300-400 मीटर अंतरावर आहे. अनेक शेतकऱ्यांची पूर्ण शेतजमीन या खड्डयात सामावली गेली आहे. येथील मुख्य पिके कॉफी आणि मिरची आहे. एक 40 वर्षीय शेतकरी सुमियाती यासारख्या अनेक लोकांनी स्वत:ची पूर्ण जमीन गमावली आहे. आता परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार अशी चिंता त्यांना आहे.  पाऊस नसतानाही जमीन हलत असल्याने आमच्या उपजीविकेवर मोठे संकट आल्याचे शेतकरी सांगतात.

प्रशासनाची उपाययोजना

प्रशासकीय अधिकारी स्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यांनी धोकायुक्त हायव्होल्टेज वीजवाहिन्या दुसरीकडे हलविल्या आहेत. मुख्य रस्त्यासाठी पर्यायी रस्ता निर्माण करण्यात आला आहे. आता ग्राउंड इंजेक्शन (मातीत विशेष सिमेंट टाकून मजबूत करणे) आणि उताराला मजबूत करण्यासारख्या उपायांची अंमलबजावणी करण्याची योजना आहे. ऊर्जा आणि खनिज संपदा विभाग स्थितीवर सातत्याने नजर ठेवून आहे.

पुढे काय?

जमिनीचे हे खचणे अद्यापही सक्रीय असून कधीकधी आणखी फैलावते. हवामानबदलामुळे पाऊस अधिक पडत असल्याने अशाप्रकारच्या घटना वाढू शकतात. ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाय आवश्यक आहेत असे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.