For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रूडबॉम्बच्या स्फोटामुळे केरळमध्ये दहशत

06:35 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रूडबॉम्बच्या स्फोटामुळे केरळमध्ये दहशत
Advertisement

एका माकप कार्यकर्त्याचा मृत्यू, दुसरा जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ कन्नूर

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील मुलियाथोड येथे शुक्रवार, 5 एप्रिलला सकाळी झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू आणि दुसरा जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. शेरीन (31) असे या बॉम्बस्फोटातील बळीचे नाव असून तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआयएम) कार्यकर्ता आहे. तसेच विनेश (24) नामक अन्य एकजण या स्फोटात जखमी झाला असून तोसुद्धा माकपाचाच सक्रीय कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाची पाहणीही केली आहे.

Advertisement

कन्नूरमधील पनूर पोलीस ठाण्यांतर्गत मुलियाथोड भागात क्रूड बॉम्ब घडवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या बॉम्बस्फोटात जखमी विनेश गंभीर जखमी झाला असून तो व्हेंटिलेटरवर आहे. दोन्ही पीडितांना सुऊवातीला कोझिकोड येथील खासगी ऊग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांना प्रथम कन्नूर येथील ऊग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आले.एका माकप कार्यकर्त्याचा मृत्यू, दुसरा जखमी

फोटो

Advertisement
Tags :

.