Satara News : कुत्र्यासारखे वर्तन करणाऱ्या ताणामुळे अंगापूर परिसरात घबराट
अंगापूर फाट्याजवळ युवकाचा विचित्र वर्तनाचा प्रकार
सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ आज दुपारी कुत्र्यासारखे विचित्र वर्तन करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला नागरिकांनी जाळ्याच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले. नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
गोपाल भील (रा.शहादा, जि. नंदुरबार) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. तो ऊस तोडणी कामगारांच्या टोळीतील असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या तरुणाला पंधरा दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. त्याने वेळेत उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीज झाला असावा, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
सातारा- रहिमतपूर रस्त्यावर अंगापूरफाट्याजवळ एक तरुण भर रस्त्यात कुत्र्यासारखे वर्तन करत असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो कुत्र्यासारखा अंगावर धावून जात होता. रस्त्यावरून येना जाण्प्रया दुचाकी स्वरांच्या अंगावरही तो धावून जात होता. रस्त्याच्या मध्यभागी दोन हात आणि गुडघ्यावर रांगत होता. मध्येच कुत्र्यासारखं दोन गुडघ्यांवर बसून दमलेल्या कुत्र्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढत होता.
हा प्रकार पाहण्प्रया नागरिकांची भांबेरी उडाली. सोशल मीडियावरही या युवकाच्या वर्तनाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. स्थानिक युवकांनी सावधपणे वाघरीच्या साह्याने या व्यक्तीला जेरबंद केले. त्याचे हात बांधल्यानंतर त्याला पोलिसांच्या मदतीने अधिक उपचारासाठी सात्ायाच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.
'रेबीज'ची लक्षणे नाहीत : शल्य चिकित्सक
रेबीजची लागण झालेल्या व्यक्तीला पाणी पिता येत नाही. मात्र या तरुणामध्ये तशी काही लक्षणे आढळून आली नाहीत. त्याच्या हालचालीवर डॉक्टर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.