Panhala World Hritage चा फायद्यापेक्षा तोटाच जास्त, स्थानिकांच्या मनात नेमकी भिती कशाची?
पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होणार?, नागरिकांना भिती
पन्हाळा : राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील 11 व तामिळनाडूमधील 1 अशा बारा किल्ल्यांची मराठी लष्करी भुप्रदेश या सदरातंर्गत जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पन्हाळ्याचा ऐतिहासिक ठेवा व या गडाचा धगधगता इतिहास जगासमोर यावा. या उद्देशाने पन्हाळगडचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात नागरिकांच्या मनात जे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जे संमभ्र निर्माण झाले आहे.
काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी पन्हाळा नागरिकांची जिल्हाधिकारी यांच्या दालनातच बैठक लावली होती. यासंदर्भात नोटिसा देखील घरोघरी देण्यात आल्या होत्या. पण या बैठकीवर पन्हाळकरांना बहिष्कार घातला. त्यामुळे नगरपरिषदेने पुन्हा या बैठकीसंदर्भात नोटीसा काढल्या असुन रद्द झालेली बैठक पुन्हा पन्हाळ्यातच शुक्रवारी 2 मे रोजी होणार असल्याचे नागरिकांना कळवले आहे. पन्हाळा वर्ल्ड हेरिटेज अर्थात जागतिक वारसा स्थळात गेल्यास यांच्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त होणार अशी भीती पन्हाळा वासियांच्या मनात घर करुन बसली आहे.
त्यात युनेस्कोच्या पथकांच्या पाहणी वेळी हटविण्यात आलेले छोटे मोठे स्टाँल्स आणि काही प्रकाराने नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळेच विरोध वाढत जाऊन नाना प्रकारच्या अफावाचे पेव जणू पन्हाळ्यावर पसरले. त्यानुषंगाने पन्हाळावासियांनी जागतिक वारसा स्थळात समावेश नको म्हणून गाव बैठकीत निर्धारच केला. याबाबत निवेदने देखील देण्यात आली. म्हणनूच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत मागील काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण पन्हाळा नागरिकांची बैठक लावण्यात आली होती.
पण उन्हाळ्याचे दिवस, लहान मुले, स्त्रिया, जेष्ठ नागरिकांना ये-जा करण्यासाठी होणारा त्रास, खर्चाची बाजु व दोन ते तीन हजार लोक जिल्हाधिकारी कार्यालयात बसणार नाहीत. नगरपरिषदेने अचानक काढलेल्या नोटीसा, ते ही कोणाला मिळाल्या, कोणाला नाही. तसेच मागील बैठका या जिल्हाधिकारी यांनी पन्हाळ्यातच घेतल्या आहेत. शिवाय सर्व गावाला कोल्हापुरात बोलावण्यापेक्षा जिल्हाधिकारी यांनी पन्हाळ्यात येऊनच बैठक घ्यावी.
म्हणून जिल्हाधिकारी यांच्या बैठकीवर पन्हाळकरांनी बहिष्कर टाकत, बैठक ही पन्हाळ्यातच झाली पाहिजे अशी मागणी केली. याबाबत उपविभागीय अधिकारी व नगरपरिषदेला निवेदन देखील देण्यात आले. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांची जागतिक वारसा स्थळासंदर्भात पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी पन्हाळ्यातील नागरिकांना पुन्हा नोटीस काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पन्हाळ्यात मयुरबन उद्यान येथे होणाऱ्या या बैठकीत नागरिक आणि प्रशासनात समन्वय होणार, पन्हाळकरांचा विरोध मावळणार की विरोध कायम राहणार हे बैठकी नंतर समजणार असल्याने याबाबत उत्सुकता लागली आहे.
"पन्हाळा जागतिक वारसा स्थळात समावेश करताना स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे नियम लावण्यात येऊ नये. स्थानिकांच्या मनात याबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या अगोदर दुर कराव्या. येथील स्थानिकांना विस्थापित करण्यात येणार असेल तर जागतिक वारसा स्थळांत पन्हाळ्याचा समावेश करु नये."
- असिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष, पन्हाळाप