For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पन्हाळा तालुक्यात 43 गावांत ‘एक गाव एक गणपती'!आर्थिक उधळपट्टीला बसतोय प्रतिबंध

06:57 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
पन्हाळा तालुक्यात 43 गावांत ‘एक गाव एक गणपती  आर्थिक उधळपट्टीला बसतोय प्रतिबंध
Advertisement

अबिद मोकाशी पन्हाळा

गणेशोत्सव म्हंटले की सर्वांच्या आनंदाचा पार वाढलेला असतो.गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुका या ठरलेल्याच.त्यात आता चौका-चौकात,गल्ली-गल्लीत अगदी पाऊलावर एक तरी सार्वजनिक मंडळांची गणेशमुर्तीचे दर्शन गावोगावी होत असते.त्यातच अमुक चौकाचा राजा,गल्लीचा राजा अशा गणपतीमुर्तीची प्रतिष्ठपना.आपले वजन दाखवण्यासाठी अनेक मंडळांची आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी डेजीचा दणदणाट आणि डोळ्यांना त्रास देण्राया लेसर लाईट आकर्षक करुन एकमेकांवर इर्ष्या करण्याचा ट्रेडच अलीकडच्या गणेशोत्सवात रुजत आहेत.याला राजकीय पुढ्रायांचा पाठीबा देखील कारणीभुत असणार.त्यामुळे मात्र वाहतुक कोंडी,लहान व व्रुद्धांना होणारा त्रास,व्यवसायिकांचे मिरवणुकीमुळे बुडणारे व्यवसाय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.पण यासर्वावर आवाज उठवणार कोण.आवाज उठवला तर तो आवाज ऐकणार कोण पेक्षा आवाज दाबण्यासाठीच अनेक हात पुढे येतात.त्यामुळे जसे चालले आहे तसे चालु दे म्हंणत सर्वसामान्य नागरिक याकडे पाठ फिरवत आहे.मात्र असे असले तरी पन्हाळा तालुक्यातील 43 अशी गावे आहेत की त्यांनी आवाढव्य खर्चाला फाट देत ‘एक गाव एक गणपती‘ या संकल्पनेचा स्वीकार केला आहे.

Advertisement

पन्हाळा तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे.त्यामुळे तालुक्याचे वेगळेमहत्तव आज ही कायम आहे.हेच वेगळेपण या गणेशोत्सवाच देखील दिसुन येत आहे.समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध व्रुद्धिगंत व्हावे,यासाठी ‘ एक गाव एक गणपती‘ ही संकल्पना तालुक्यात जोर धरताना दिसत आहे.यावर्षी पन्हाळा तालुक्यातील 43 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती‘उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे.यामुळे पन्हाळा तालुक्यातील इतर गावांसह संपुर्ण राज्याला या गावांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणरी ‘एक गाव एक गणपती‘ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे.शहरी आणि ग्रामीण विभागातील भक्तांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणुन गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे.मात्र आता गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट‘झाल्यापासुन त्यामध्ये अर्थकारणासह राजकरण आले आहे.
मुंबईसह,पुणे कोल्हापुर सारख्या शहरातच नव्हे,तर गावागावात गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरु लागले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिह्यांत सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशांची उधळपट्टी थांबावी,गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा,यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समतीचे डाँ.नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती‘चा पुरस्कार करीत हा उपक्रम गावगावांत पोहचविण्याचे महत्त्वपुर्ण काम केले.त्याचा फायदाही होत आहे.

Advertisement

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या द्रुष्टीने पोलिस दलावर मोठा ताण असतो.‘एक गाव एक गणपती‘ म्हणजे प्रशासन आणि ग्रामस्थांच्यातील एकजुटीचे फलित आहे . तरी जास्तीत जास्त मंडळांनी एक गाव एक गणपती साठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून पन्हाळा तालुक्याचा एक वेगळा आदर्श सर्वांसमोर येईल.:संजय बोंबले(सहाय्यक पोलीस निरीक्षक, पन्हाळा पोलीस ठाणे)
म्हाळुंगे,मंगळवारपेठ,नेबापुर,बुधवारपेठ,आंबवडे,बांदिवडे,इंजोळे,इब्राहीमपुरपेठ,दाणेवाडी,मराठवाडी,बोंगेवाडी,आंबर्डे,आसगाव,गोठे,तांदुळवाडी,निवाचीवाडा

Advertisement
Tags :

.