विद्यासेवक पतपेढी सावंतवाडीच्या अध्यक्षपदी पांडुरंग काकतकर
उपाध्यक्षपदी गोविंद कानसे
न्हावेली /वार्ताहर
विद्यासेवक पतपेढी सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सोनुर्ली हायस्कूलचे शिक्षक पांडुरंग काकतकर यांची तर उपाध्यक्षपदी गोविंद कानसे यांची बिनविरोध करण्यात आली .संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा सावंतवाडी येथील पतसंस्था कार्यालयात अध्यासी अधिकारी राजन आरावंदेकर, अधीन सावंतवाडी उपनिबंधक कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी पांडुरंग गोपाळ काकतकर यांची तर उपाध्यक्ष पदासाठी गोविंद कानसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर सभेला संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष पवन वणवे,जयवंत पाटील,संचालक तथा माजी उपाध्यक्ष शरद जाधव, हर्षाली खानविलकर, संचालक विठ्ठल सावंत,राजेश गुडेकर, हंबीरराव अडकुरकर,अनुष्का गावडे, संस्था सचिव आराध्या पेंडूरकर,वराडकर उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीबद्दल समृद्धी पॅनलचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष ओमप्रकाश तिवरेकर, शिक्षक भारतीचे जिल्हा सचिव तथा जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष समीर परब,शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष तथा जिल्हा पतपेढीचे संचालक प्रदिप सावंत,शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटनेचे पदाधिकारी वैभव केंकरे,अनिल जाधव,भिवा धुरी, शिक्षक नितीन गवंडळकर, संतोष वैज यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.