For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पांडुरंग सीसी, व्हीसीसी टिळकवाडी विजयी

10:40 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
पांडुरंग सीसी  व्हीसीसी टिळकवाडी विजयी
Advertisement

महांतेश कवटगीमठ क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन दुसऱ्या महांतेश कवटगीमठ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत निमंत्रितांच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून चारमिनार संघाने ड्रीम इलेव्हन उदगुड्डीचा, पांडुरंग सीसीने अजय भोसले कडोलीचा, व्हीसीसी टिळकवाडीने बी. जी. स्पोर्ट्सचा तर पांडुरंग सीसीने चारमिनारचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. विनोद, जहीद, निहामिया, कुणाल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात चारमिनारने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 9 गडी बाद 96 धावा केल्या. मुजमिलने 1 षटकार, 5 चौकारांसह 28, विनोदने 1 षटकार 2 चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या. ड्रीम इलेव्हनतर्फे बकुडने 13 धावांत 3 तर सचिनने 18 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर ड्रीम इलेव्हनने 8 षटकांत 7 गडी बाद 40 धावा केल्या. सचिनने 4 चौकारांसह 21 धावा केल्या. चारमिनारतर्फे विनोदने 4 धावात 3 तर परवेझने 1 गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात अजय भोसले आयोध्या कडोलीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 9 गडी बाद 54 धावा केल्या. त्यात आकाश कटांबळेने 3 चौकारांसह 16, तर गजाननने 3 चौकारांसह 15 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे जहेदने 8 धावात 3 तर मुक्रामने 15 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पांडुरंग सीसीने 5.3 षटकात 5 गडी बाद 55 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. कुणालने 1 षटकार, 2 चौकारांसह 17, तर रब्बान डी.ने 3 चौकारांसह 14 धावा केल्या. कडोलीतर्फे साहिलने 6 धावांत 2 तर आकाश कटांबळेने 18 धावात 2 गडी बाद केले.

तिसऱ्या सामन्यात बी.जी. स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 6 गडी बाद 90 धावा केल्या. अंकजने 1 षटकार, 1 चौकारांसह 22, सुशांतने 1 षटकार, 3 चौकारांसह 3 धावा केल्या. व्हीसीसी टिळकवाडीतर्फे लभानने 34 धावात 3 तर बेंजामिनने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हीसीसीने 7.5 षटकात 6 गडी बाद 93 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात निहामियाने 3 षटकार, 3 चौकारांसह 26 चेंडूत 48 तर सुरेशने 2 षटकार, 1 चौकारांसह नाबाद 16 धावा केल्या. बीजी स्पोर्ट्सतर्फे अथर्वने 16 धावांत 2 तर संदेशने 1 गडी बाद केला.

चौथ्या सामन्यात पांडुरंग सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 3 गडी बाद 158 धावा केल्या. त्यात कुणालने 6 षटकार व 6 चौकारांसह 19 चेंडूत 63 तर संदीपने 6 षटकारांसह 8 चेंडूत 36 धावा केल्या. चारमिनारतर्फे अली व परवेझ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर चारमिनारने 8 षटकांत 4 गडीबाद 65 धावा केल्या. त्यात शहाबाजने 1 षटकार, 2 चौकारांसह 21 तर इम्रानने 1 षटकार 2 चौकारांसह 15 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे जहिदने 12 धावांत 3 तर विकासने 20 धावांत 2 गडी बाद केले.

गुरुवारचे सामने

  • मराठा स्पोर्ट्स ग्रामीण वि. झारा इलेव्हन सकाळी 8.30 वा.
  • मोहन मोरे मुंबई वि. रामराज्य खडक गल्ली सकाळी 10.30 वा.
  • एचएमडी वि. डेपो मास्टर्स सकाळी 12.30 वा.
  • पहिल्या व दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 1.30 वा.
Advertisement
Tags :

.