For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पांडुरंग सी सी, हनुमान स्पोर्ट्स पुढील फेरीत

10:30 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
पांडुरंग सी सी  हनुमान स्पोर्ट्स पुढील फेरीत
Advertisement

महांतेश कवटगीमठ चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित दुसऱ्या महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यांतून गो-गो स्पोर्ट्सने महालक्ष्मी स्पोर्ट्स कुसमाळीचा, प्रथमेश मोरेने गोल्डन स्पोर्ट्सला व गो गो स्पोर्ट्सला पराभूत केले तर हनुमान स्पोर्ट्सने फ्रेंड्स इलेव्हनचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. ओमकार तोरे, कपिल, अमित, अक्षय यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

सरदार मैदानावरती झालेल्या पहिल्या सामन्यात महालक्ष्मी स्पोर्ट्स कुसमळीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 4 गडी बाद 73 धावा केल्या. सिद्धूने 1 षटकार, 3 चौकारांसह 22, हर्षदने दोन चौकाराचे 18 धावा केल्या. गो-गो स्पोर्टस झुबेरने 12 धावा 2 तर नागेंद्रने 1 गडी बाद केला. त्यानंतर गो गो स्पोर्ट्सने 6.1 षटकात चार गडी बाद 77 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला.अक्षयने 1 षटकार, 2चौकारासह नाबाद 25, समीरने 3 षटकार, 1 चौकारासह 24 धावा केल्या. महालक्ष्मीतर्फे मंजू व कमलाकर प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात प्रथमेश मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 2 गडी बाद 142 धावा केल्या. अमितने 5 षटकार व 7 चौकारांसह 19 चेंडूत नाबाद 63, श्यामने 4 षटकार, 1 चौकारासह 34 धावा केल्या. गोल्डनतर्फे राहुल व अभिजीत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गोल्डन स्पोर्ट्सने 8 षटकांत 5 गडी बाद 38 धावा केल्या. इम्रान नाईकवाडीने 11 तर कुतुबूद्दिनने 7 धावा केल्या. प्रथमेश मोरेतर्फे रोहनने 2 तर सिद्धार्थने 1 गडी बाद केला.

तिसऱ्या सामन्यात फ्रेंड्स इलेव्हानने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 5 गडी बाद 52 धावा केल्या. बाबूने 13 तर बकुळने 14 धावा केल्या. हनुमानतर्फे कपिलने 13 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर हनुमान स्पोर्ट्सने 6.2 षटकांत 6 गडी बाद 53 धावा करून सामना 4 गाड्यांनी जिंकला. सोहेलने 26, तर अझरने 10 धावा केल्या. फ्रेंड्स सर्वेश, मनोज व बाबू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात गो गो स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 5 गडी बाद 96 केल्या. अक्षयने 1 षटकार, 5 चौकारां सह 34, तर अभयने 21 धावा केल्या. त्यानतंर प्रथमेश मोरे संघाने 6.1 षटकात सहा गडी बाद 97 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. शामने 4 षटकार, 2 चौकाराच्या मदतीने 35, राहुलने 4 षटकारसह 26 धावा केल्या. गो गोतर्फे झोयाब व नागेंद्र यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

बुधवारचे सामने

  • ड्रीम इलेव्हन हुक्केरी वि. चारमिनार सकाळी 8.30 वाजता.
  • पांडुरंग सीसी वि. अजय भोसले आयोध्या कडोली सकाळी 10.30
  • व्हीसीसी टिळकवाडी वि. एचडी स्पोर्ट्स दुपारी 12.30 वाजता.
  • पहिल्या संघातील विजेता वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 2.30 वाजता.
Advertisement
Tags :

.