For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंडित नेहरूच्या खेळाडूचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

11:01 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंडित नेहरूच्या खेळाडूचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित उत्तरप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील विद्यार्थी  राजू दोडमणीने 48 किलो वजन गटात कांस्यपदक पटकाविले. या विद्यार्थ्यांला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी तसेच मुख्याध्यापक माऊती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारीवर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.