For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur | पंढरपूरचा ऐतिहासिक क्षण : इंदिरा गांधींची पाच तास उशिराची तरीही गाजलेली सभा

06:17 PM Nov 19, 2025 IST | NEETA POTDAR
pandharpur   पंढरपूरचा ऐतिहासिक क्षण   इंदिरा गांधींची पाच तास उशिराची तरीही गाजलेली सभा
Advertisement

                                       इंदिरा गांधींची पंढरपूर यात्रा

Advertisement

by चैतन्य उत्पात

पंढरपूर : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची आज जयंती आयर्न लेडी म्हणून आपली राजकीय कारकीर्द गाजविलेल्या इंदिरा गांधी या दोनवेळा पंढरपुरात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या पंढरीतील सभेला पाच तास उशीर झाला असूनही लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी वाट पाहत होते.

Advertisement

१९८० साली मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर देशात निवडणुकीचे वारे वाहत होते. इंदिरा गांधी यांची सभा पंढरपूर येथील अंबाबाई पटांगण येथे आयोजित केली होती. सांगली येथून अँबेसिडर कारने येताना त्यांना उशीर होत होता. रात्री ९ वाजताची सभा असताना लोक इंदिरा गांधी यांची वाट बघत पहाटे पाच वाजेपर्यंत या लोकांना थांबवून ठेवण्याचे काम माजी आमदार पांडुरंग डिंगरे, तुळशीदास जाधव यांनी केले. तात्या डिंगरे यांनी सभेला जमलेले लोक कंटाळू नयेत

यासाठी सलग पाच तास भाषण चालू ठेवले. या सभेला रामराव आदिक, माजी खा. तुळशीदास जाधव, वैराग येथील धन्यकुमार भूमकर, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, तेव्हाचे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजीराव गरड, दि. श. कमळे गुरुजी, आनंदराव देवकते, माजी खा. गंगाधर कुचन आदी उपस्थित होते. पहाटे पाच वाजता इंदिरा गांधी आल्या त्यांनी भाषण केले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात इंदिराजींच्या हस्ते महापूजा करण्यात आली

. यावेळी साक्षात परब्रम्ह श्री विठ्ठलास आरसा दाखविण्याचा मान असलेले पांडुरंग डिंगरे यांनी इंदिरा गांधी यांना भारताच्या पंतप्रधान व्हावे म्हणून आशीर्वाद दिला. काँग्रेसला बहुमत मिळून इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. डिंगरे यांनी लोक खिळवून ठेवली होती. इंदिरा गांधी यांना समजले. त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे विधानसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत शरद पवार यांच्या समाजवादी कॉग्रेस पक्षाकडून विरोधात उभे असलेल्या माजी आमदार औंदुबर आण्णा पाटील यांचा पराभव करून डिंगरे आमदार शहाजी पाटील आमदार म्हणून निवडून आले. नागरिकांचे प्रेम पाहून इंदिरा गांधी भारावून गेल्या होत्या

शहरातील प्रदक्षिणा मार्गावरून तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष वसंतदादा पाटील, इंदिरा गांधी यांची उघड्या जीप मधून मिरवणूक काढण्यात आली होती. इंदिराजी यांना पाहण्यासाठी संपूर्ण पंढरपूर शहर लोटले होते. नागरिकांचे प्रेम पाहून इंदिराजी भारावून गेल्या होत्या. याच वेळी कैकाडी महाराज मठ येथे त्यांनी भेट दिली होती.

यापूर्वी १९६४ साली स्व. इंदिरा गांधी पंढरपूर पेट येथे आल्या होत्या. काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. न्ना पक्षाचा दौऱ्यानिमित्त नवी पेठ येथील झेंडा या चौकात त्यांची सभा झाली होती. यावेळी माजी भे आमदार बाबुराव जोशी, करमाळा येथील ज्येष्ठ गा नेते नामदेवराव जगताप, स्वातंत्र्यसैनिक पां. तु. कार उत्पात, औंदुबर अण्णा पाटील, बबनराव बडवे, ते, भगवानराव भादुले, बाबुराव बागल, बाबुराव ले. म्हमाणे आदी उपस्थित होते.
-
-

Advertisement
Tags :

.