For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू वाहतुकीविरोधात कारवाई

06:06 PM Jan 04, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू वाहतुकीविरोधात कारवाई
Advertisement

                              पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई

Advertisement

पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलीस आणि महसूल प्रशासनाच्यावतीने अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी व सरकोली याठिकाणी बाळू वर कारवाई करत १३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी गावातील खर्डी ते शिरभावी जाणाऱ्या रोडवर तपासणीनंतर टेम्पोमध्ये एक ब्रास बाळू मिळून आली आहे. बाळू अवैधरित्या अशोक लेलैंडमध्ये बाहतूक करताना मिळून आलेली असून पंढरपूर तालुका पोलिसांनी बिगर नंबरचा व बाळू असा एकूण सहा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलेला आहे. सरकोली या ठिकाणी अशोक लेलैंडटेम्पो ताब्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक ब्रास बाळू एकूण किंमत सहा लाख सहा हजार असे एकूण दोन अशोक लेलैंड कंपनीचे टेम्पो व दोन ब्रास बाळू असा तेरा लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलीस आणि जप्त करून सदर गाडीचा चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

Advertisement

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सपोनी शहाजी गोसावी, सपोनी विभावरी रेळेकर, उपनिरीक्षक विक्रम बढणे, सपोनी बनसोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे, मंगेश रोकडे, सुहास देशमुख, दीपक भोसले, तात्या गायकवाड, सतीश चंदनशिवे यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement
Tags :

.