For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : शालेय मुलांच्या सहलीने गजबजले पंढरपूर

05:34 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur   शालेय मुलांच्या सहलीने गजबजले पंढरपूर
Advertisement

                      महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी पंढरपूरमध्ये

Advertisement

पंढरपूर : भारताची दक्षिण काशी, राज्याचे प्रमुख दैवत असलेल्या विठुरायाच्या नगरीत शालेय, महाविद्यालयीन मुलांच्या सहली येत आहेत. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बरोबरच इतर प्राचीन मंदिरे, मठ, देवस्थान, चंद्रभागा नदी आदी प्रेक्षणीय स्थळे पाहून आनंद अनुभवत आहेत. त्यामुळे पंढरपूर गजबजून गेले आहे.

सहसा डिसेंबर हा वर्षाअखेरचा महिना शालेय सहली, वार्षिक पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलन, गेट टुगेदर यासाठी महत्त्वाचा असतो, थंडीचा आल्हाददायक मौसम असल्याने भटकंती, पर्यटन हौसेने केले जाते. शालेय सहलीसाठी पंढरपूर हा उत्तम पर्याय ठरत असून कोल्हापूर, गडहिंग्लज, गारगोटी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर, अमरावती, अकोला, पुणे, ठाणे या महाराष्ट्रातील जिल्ह्यांबरोबरच शेजारील कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश या राज्यांतील शालेय सहली येत आहेत, येथीलकैकाडी महाराज मठातील संतांच्या विविध प्रतिकृती, अध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक माहिती विषद करणारी चित्रे, कृत्रिम रेल्वे, गरुड, मगर, बाघ, सिंह हे सारे मुलांना मंत्रमुग्ध करीत आहेत.

Advertisement

संत तनपुरे महाराज मठातील ज्योतिर्लिंग, बारा पृथ्वीला फेऱ्या मारणारा गणपती, नदी काठावरील सुंदर, नयनरम्य घाट असलेले इस्कॉन जगन्नाथ मंदिर, गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिर, जनाबाईचे जाते, विष्णुपद मंदिर, नदीपात्रातील नारद मंदिर, हिरव्यागार झाडीने बहरलेले विष्णुपद उद्यान, निसर्गरम्य यमाई तलाव याच भागात असलेले तुळशीवृंदावन, पंढरपूर शहरापासून जवळच असणारे संध्या बळी देवीचे मंदिर, शेगाव संस्थानचे गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणे पाहून विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मंत्रमुग्ध होत आहेत, काय

Advertisement
Tags :

.