For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur Accident News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

06:58 PM Jun 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pandharpur accident news    देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला  भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Advertisement
                                              सहाजण जखमी : मृतांत ४ मुलांसह चार महिलांचा समावेश
पंढरपूर: तालुक्यातील म्हसवड - पंढरपूर मार्गावर रविवारी दुपारच्या सुमारास तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण जखमी झाले आहेत, हे सर्वजण म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन रांजणी गावी परतत होते. मृतांमध्ये ४ लहान मुलांचा आणि ४ महिलांचा समावेश आहे.  अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०, रा. रांझणी, पंढरपूर) पूजा अमोल सातोरे (वय २३, रांजणी), पूजा बालाजी बावचे, (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १५), अपघातातील सर्व मृत हे  पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे आहेत.
संस्कृती संदीप बावचे (वय १४), आरब अमोल खातोरे (बय ८), समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सिद्धेश्वर पोपट जाधव, सागर चौगुले, पूजा अमोल सातोरे, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे, शशिकला पोपट जाधव, बालाजी बावचे, संदीप बाबचे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे, बालाजी बावचे यांची लहान मुले जखमी झाली आहेत.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर
अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली असून, ही घटना अतिशय दुर्देवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने ७ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकअप गाडी पडल्याने ही दुर्घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलासह प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाचे पथकही तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
चालकाचे नियंत्रण सुटल्याची चर्चा 
दरम्यान, येथील विहिरीजवळ यापूर्वी अपघात झालेले नाहीत. यापूर्वी इथे अपघात झाला नव्हता. हा पहिलाच अपघात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. ही विहीर रस्त्याच्या कडेला होती. भाविकांसह पिकअप वाहन या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते,
त्यामुळे पिकअप थेट पाण्यात कोसळली आणि हा अपघात झाला. या अपघाताची माहिती समोर येताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांमध्ये ४ लहान मुलांचा आणि ४ महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत २ जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली होती.
Advertisement
Advertisement
Tags :

.