महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी

06:50 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

15 लाख भाविक दाखल :  चंद्रभागा वाळवंटात हरी नामाचा जागर : पावसाच्या उसंतीमुळे भाविकांचे थांबले हाल

Advertisement

संतोष रणदिवे/ पंढरपूर

Advertisement

‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’

संत चोखामेळांच्या अभंगाप्रमाणे गेल्या वीस दिवसांचा प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना पंढरीचे सुख हे त्रिभुवनात सामावणार नाही, असेच आहे. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा विठोबा आहे. या एकाच भावनेतून एकादशीच्या पूर्वसंध्येला येथे सुमारे 15 लाखांच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत.  यंदा पाऊस वेळेत झाल्याने भाविकसुध्दा पंढरीत मोठ्या उत्साहाने दाखल झाले आहेत. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ।।

डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचे मुख ।।

मंगळवारी पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूरच्याजवळ जाऊन पोहाचली होती.  देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. तर लाखो भाविक हरी नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीसाठी धावा करीत दर्शन रांगेत उभे आहेत. मंदिर समितीकडून भाविकांची वारा व पावसापासून सोय व्हावी यासाठी दर्शन रांग वॉटरप्रुफ उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन रांगेत साबुदाणा खिचडी व चहाचे वाटपसुध्दा करण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीच्या अगोदर येऊन येथील प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी कऊन सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बुलेटवऊन भक्तिसागर, दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंटातील सोयी सुविधांची पाहणी कऊन भाविकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत.

।। साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा ।।

एकादशीच्या सोहळयासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह सर्व मानांच्या संतांच्या पालख्या व दिंडया पंढरीत येऊन विसावल्या आहेत. वाखरी येथून निघाल्यानंतर कॉलेज रोडसह सारा परिसर हा गर्दीने आणि माउलींच्या आणि विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सध्या संपूर्ण पंढरीनगरी विठ्ठलमय होऊन गजबजून गेली आहे.

नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे. याशिवाय  चंद्रभागेमध्ये पाणी असल्याने स्नानाचा आनंद भाविकांनी लुटला आहे. चंद्रभागा वाळवंटात महिला भाविकांसाठी चेजिंग ऊम, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आलेली आहे. आपतकालीन मदत केंद्रातून भाविकांना सूचना देण्यात येत आहेत. पोलिसांच्या सतर्क यंत्रणेमुळे कुठेही गोंधळ झालेला दिसून आलेला नाही.

शहरातसुध्दा भाविकांच्यासाठी भक्तिसागर याठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे याठिकाणी राहुट्या उभाऊन वारकरी वास्तव्यास आहेत. वीज, पाणी, सुरक्षा यांची सोय करण्यात आली असून ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या शासनाच्या उपक्रमातून याठिकाणी लाखो भाविकांची आरोग्य तपासणीसुध्दा करण्यात येत आहे. भक्तिसागर परिसरात मूर्त्या, प्रासादिक वस्तू, टाळ, मृदुंग, वीणा, माळ आदींची दुकानेसुध्दा मोठया प्रमाणात थाटलेली आहेत. त्यामुळे याठिकाणचा तीन रस्ता परिसरातील रस्ता हा व्यापून गेला होता.

विठ्ठल नामाची शाळा भरली

आषाढी एकादशीच्या सोहळयासाठी प्रमुख संतांच्या पालख्यासमवेतच मोठ्या संख्येने भाविकांची दाटी पंढरपुरात झालेली दिसून आली. त्यामुळे एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात हरिजागर झालेला दिसून आला. त्यामुळे अवघी पंढरीनगरी एकादशीपूर्वीच दुमदुमली आहे. भक्तिसागर व पंढरपुरात शहरात वैष्णवांकडून हरी नामाचा जागर करण्यात येत होता.

भाविकांना विठ्ठल दर्शनाची आस

आषाढी यात्रा सोहळा मोठया उत्साहात भाविक नयनांनी अनुभवत आहेत. पालख्यांमध्ये दाखल झालेले श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. आषाढी यात्रेतील शेवटचा रिंगण सोहळा लक्ष-लक्ष नयनांनी अनुभवला. अश्वांनी रिंगण पूर्ण करताच भाविकांनी एकच जल्लोष केला. रिंगण सोहळयाप्रसंगी भाविकांत मोठया प्रमाणात भक्तिभाव उत्साह दिसून आला. त्यानंतर पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#pandarpur#social media
Next Article