For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panchgani tourism decline | पाचगणीचे पर्यटन धोक्यात! दीड वर्षांपासून रस्ता खोदलेलाच; टेबल लँडवर पर्यटकांची पाठ

04:38 PM Apr 09, 2026 IST | NEETA POTDAR
panchgani tourism decline   पाचगणीचे पर्यटन धोक्यात  दीड वर्षांपासून रस्ता खोदलेलाच  टेबल लँडवर पर्यटकांची पाठ
Advertisement

                           खराब रस्त्यांमुळे पाचगणीत शुकशुकाट

Advertisement

पाचगणी - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पाचगणी येथे पर्यटनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र समोर आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉल धारक, घोडे चालक आणि स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या दीड वर्षांपासून महाबळेश्वर- पाचगणी मुख्य रस्ता संबंधित ठेकेदाराने खोदून ठेवला असून अद्यापही हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनी या पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेल्या टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि पारसी पॉइंट या प्रेक्षणीय स्थळांवर आता शांतता पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य वातावरण असूनही खराब रस्त्यांमुळे पर्यटक येण्यास टाळाटाळ करत आहेत.

Advertisement

पर्यटकांची संख्या घटल्याने स्टॉल धारक, घोडे चालक आणि इतर स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आर्थिक परिणाम झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दीड वर्षांपासून रस्ता पूर्ण होत नाही. पर्यटक येत नाहीत, आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने तातडीने हा रस्ता पूर्ण करावा.”स्थानिकांनी जिल्ह्यातील चार ते पाच मंत्र्यांनी या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करावे, तसेच ठप्प झालेल्या पर्यटनाला पुन्हा नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी केली आह रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पाचगणी येथील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून, स्थानिक व्यावसायिकांचे भविष्य आता या रस्त्याच्या कामावरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.