For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाचगणीत पुन्हा एकदा बारबाला नाचवल्या

03:02 PM Jan 09, 2025 IST | Radhika Patil
पाचगणीत पुन्हा एकदा बारबाला नाचवल्या
Advertisement

पाचगणी :

Advertisement

पाचगणीच्या हिराबाग हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री बारबाला आणून तोकड्या कपड्यात अश्लील डान्स सुरू असतानाच पाचगणी पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला. याप्रकरणी 20 जणांवर याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जानेवारी रोजी पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर ‘हॉटेल हिराबाग’मध्ये विविध ठिकाणांहून आणलेल्या 12 महिलांना उत्तान कपड्यात बिभत्स हावभाव करणाऱ्या बारबाला नृत्यात सामील करून अश्लिल नृत्याचे आयोजन केले गेले होते. या घटनेची माहिती अज्ञात खब्रयाने पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना देण्यात आली. पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी या घटनेची माहिती सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कानावर टाकली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या बारबाला ज्या हॉटेलवर नाचत आहेत त्या हॉटेलवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या नृत्याच्या प्रसंगी महिलांनी गिऱ्हाईकांसोबत अंगविक्षेप करत नृत्य केले, जे पाहून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेलवर छापा टाकून हॉटेलमधील 20 जणांना ताब्यात घेतले.

Advertisement

यापूर्वी देखील पाचगणी टेन्ट हाऊसमध्ये अशाच पद्धतीच्या बारबाला नाचल्या होत्या. त्या पाचगणी टेन्ट हाऊसवर देखील पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर पाचगणी व परिसरामध्ये छुप्या पद्धतीने असे अनेक हॉटेल्समध्ये बारबाला नाचवल्या जातात. मात्र प्रत्यक्षात अज्ञात खबऱ्याने पोलिसांना कारवाई करावी लागेल अशी माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेल हिराबागमध्ये छापा टाकला. घटनास्थळी 20 गिऱ्हाईकांसोबत 12 बारबाला उत्तान कपड्यांमध्ये विभत्स हावभाव करत उभ्या होत्या. गिऱ्हाईक या नृत्यात सहभागी झाले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 20 लोकांमध्ये हॉटेलचे मालक आणि इतर सहभागी यांचा समावेश आहे. तसेच, स्थानिक पोलिसांनी साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे. एकुण 25 लाख 45 हजार 500 रुपये किंमतीच्या साहित्याचा जप्ती आदेश दिला आहे.

या प्रकरणावर महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष कायद्यातील कलम 296, 223, महिला प्रतिष्ठा संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3 8, तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 75() अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.