पंचगंगा व भोगावती नद्यांवरील उपसाबंदी तात्पुरती स्थगित; राजू सुर्यवंशी यांची माहीती
कसबा बीड/ वार्ताहर
पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले होते. अचानक उपसाबंदी व महावितरणचे लाईट शेडुल्ड यामुळे भागातील शेतकऱ्यांनी यावर आवाज उठवला असता स्मिता माने यांच्याशी फोनवरून संपर्क करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मोबाइल वरून संपर्क केला, तेव्हा त्या चर्चेतून ते चार दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे, असे करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले. तसेच उपसाबंदी लागू करताना शेतकऱ्यांनाही अगोदर चार आठ दिवस अगोदर सांगावे जेणेकरून हाता तोंडाशी आलेले पीकांचे नुकसान होणार नाही, असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.
भोगावती नदी- कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील ठाणे-आळवे को.प.बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्या पर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदी पर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावर नदीवरील भागातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने व राजेंद्र सुर्यवंशी यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले