For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचे योगदान

विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांचे योगदान
Advertisement

आचरा प्रतिनिधी : तोंडवळी वरची (ता. मालवण) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी वरची येथील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने पंचायत समिती, मालवणचे सदस्य गणेश तोंडवळकर यांनी शाळेला दोन संगणक व एक इन्व्हर्टर देणगीस्वरूपात प्रदान केले. या देणगीमुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यास मोठी मदत होणार असून, वीजपुरवठा खंडित झाल्यासही अध्यापनाचे काम अखंडितपणे सुरू राहणार आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या समाजोपयोगी कार्याबद्दल उपस्थितांनी श्री. तोंडवळकर यांचे मनःपूर्वक कौतुक केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता परब, सहकारी शिक्षिका सौ. सोनल कदम व सौ. विभा ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. अनन्या पाटील, सौ. मानसी चव्हाण, श्री. मिलिंद पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.