2 जुलैपासून पाहता येणार ‘पंचायत 4’
फुलेरामध्ये रंगणार आता राजकारण
वेबसीरिज ‘पंचायत’चे मागील तीन सीझन सुपरहिट ठरले होते. प्रेम, मैत्री आणि राजकारणाने पुरेपूर या सीरिजच्या कहाणीने सर्वांना वेड लावले होते. आता याच्या चौथ्या सीझनची प्रतीक्षा लोक करत आहेत. नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, जितेंद्र कुमार, संविका, दुर्गेश, सुनीता राजवर आणि पंकज झा हे कलाकार असलेल्या ‘पंचायत 4’ची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
पंचायत ही सीरिज द वायरल फीलर म्हणजेच टीव्हीएफने निर्माण केली आहे. दीपक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय याचे दिग्दर्शन असून चंदन कुमार लेखक अन् निर्माता आहे. पंचायत सीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या अखेरीस प्रधानजीवर गोळी झाडल्याने ते जखमी झाले होते. फुलेरामध्ये निवडणुकीच्या वातावरणादरम्यान सर्वत्र टेन्शन दिसून आले होते.
पंचायत सीझन 4 चा ट्रेलर अद्याप जारी करण्यात आलेला नाही. परंतु टीझर सादर करण्यात आला आहे. या सीझनचे सर्व एपिसोड 2 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहेत. या सीरिजमध्ये निवडणुकीचे वातावरण दिसून येणार आहे.