For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पंचम खेमराजच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ हँडबॉल संघात निवड

12:03 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पंचम खेमराजच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठ हँडबॉल संघात निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे विद्यार्थी खेळाडू सुजल गवस, प्रणव सावंत ,कुणाल परब, विशाखा गवस व अक्षदा गवस यांची मुंबई विद्यापीठ हँडबॉल संघातून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हँडबॉल स्पर्धा 2023 -24 करिता निवड झाली आहे. सदर स्पर्धा (मुले) दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी डॉ. एच.जी विश्वविद्यालय सागर ,मध्य प्रदेश येथे संपन्न होणार आहे.तर मुलींच्या स्पर्धा दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी एम. आय. एस. विद्यापीठ उदयपूर येथे संपन्न होणार आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले,कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले,कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले,संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, संचालक प्रा. डी टी देसाई सहसंचालक अॅड.श्यामराव सावंत, सदस्य डॉ.सतीश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य व मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. डी एल भारमल,श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी चे क्रीडा संचालक व मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. चंद्रकांत नाईक यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.